''ब्राह्मण म्हणजे...'', लकी अलीला 'ती' पोस्ट भोवली; आता माघार घेत काय म्हणतोय पाहाच

Lucky Ali Controversy: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लकी अली याला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे (Lucky Ali Post) नेटकऱ्यांची सणाणून टीका सहन करावी लागली आहे. या टीकेमुळे त्यानं आपली पोस्ट डिलिट (Lucky Ali Deleted Post) केली आहे आणि सोशल मीडियावर जाहीर माफीही (Lucky Ali Apologies) मागितली आहे. नक्की काय म्हटलंय त्यानं आपल्या पोस्टमध्ये आणि हा वाद नक्की काय होता? जाणून घेऊया या लेखातून.   

गायत्री हसबनीस | Updated: Apr 12, 2023, 07:11 PM IST
''ब्राह्मण  म्हणजे...'', लकी अलीला 'ती' पोस्ट भोवली; आता माघार घेत काय म्हणतोय पाहाच title=

Lucky Ali Controversial Post: सोशल मीडियावर आजकाल विविध पोस्ट व्हायरल (Lucky Ali Apologies) होत असतात. अनेकदा 'या' पोस्ट बॉलिवूड सेलिब्रेटींच्या असतात. आपल्यापैंकी अनेकांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट (Lucky Ali Criticized) पसंत पडतात अथवा पडतही नाही. कित्येकदा नेटकरी हे कुठल्याही वादग्रस्त पोस्टवर सणाणून टीका करतात आणि या वादाची सगळीकडेच जोरदार चर्चा होते त्यानंतर टीका झाल्यावर (Lucky Ali Post Deleted) हे सेलिब्रेटी आपली पोस्ट मागेही घेतात.

बॉलिवूडमध्ये हल्ली असंच काहीसं फॅड निघालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर एक वाद संपतो तोच दुसरा पुन्हा येऊन हजर असतो. सध्या अशाच एका वादग्रस्त पोस्टची सगळीकडेच चर्चा आहे. सुप्रसिद्ध गायक लकी अली याची (Lucky Ali News) अशीच एक खळबळजनक पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. काल मंगळवारी लकी अली यानं एक पोस्ट व्हायरल केली त्यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर आज लकी अलीनं ती पोस्ट डिलिटही केली आणि त्याबद्दल त्यानं जाहीर माफी सोशल मीडियावरून मागितली आहे. (Bollywood singer lucky ali apologies after netizens critised him on his post entertainment news marathi)

परंतु नक्की हे प्रकरण आहे तरी काय? लकी अली यांनी नक्की अशी कोणती पोस्ट लिहिली होती? नक्की त्यांच्यावर टीका का झाली? माफी मागताना त्यानं काय म्हटलं आहे? या लेखातून जाणून घेऊया की हे प्रकरण नक्की आहे तरी काय? 

काय आहे नक्की प्रकरण?

मंगळवारी फेसबुकवर लकी अली यानं एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यानं म्हटलं होतं की, 'ब्राह्मण' हा शब्द 'अब्राहम'वरून आला आहे. त्यानंतर त्याच्या या पोस्टवरून बराच वाद सुरू झाला आणि नेटकऱ्यांनी लकी अलीला खडेबोल सुनावलं. त्यानंतर लकी अलीनं आपली ही फेसबुक पोस्ट डिलिट केली आहे आणि नेटकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे.

त्यानं यात म्हटलं आहे की, '''ब्राम्हण' हा शब्द 'ब्रम्हा'वरून आला आहे जो 'अबराम'वरून आला आहे आणि 'अबराम' हा 'अब्राहम' किंवा 'इब्राहिम'वरून आला आहे. ज्यांना सर्व राष्ट्रांचे पिता मानले जाते. ब्राम्हण हे इब्राहिमचे वंशज आहेत. 'ब्राम्हण' नावाची उत्पत्ती 'अबराम' या नावावरून झाली आहे जी 'अब्राहम' किंवा 'इब्राहिम'पासून झाली आहे. ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहे. मग प्रत्येकजण विनाकारण एकमेकांशी भांडण का करतो?'' या पोस्टवरून त्याला नेटकऱ्यांची सडेतोड टीका ऐकावी लागली आहे आणि अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.  

माफी मागत लकी अली काय म्हणाला?

लकी अलीनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये तो लिहितो की, ''माझ्या कालच्या पोस्टमुळे वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तसं माझ्याकडून घडलं असेल तर त्याचा मला खेद वाटतो आहे. आपल्या सगळ्यांनीच एकत्र यावे हाच माझा या पोस्टमागील उद्देश होता. यामुळे माझे हिंदू बंधू-भगिनी दुखावले गेले आहेत. त्यासाठी मी त्यांची मनापासून माफी मागतो. यापुढे मी कोणतीही पोस्ट करताना अशा गोष्टींचा गांभीर्यानं विचार करेन आणि अधिक सावध होऊन यापुढे मी व्यक्त होईन.'' 

लकी अली हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आहे. तरूण पिढी ही त्याच्या गाण्यांची फॅन आहे. त्याच्या शोलाही तरूणाईची गर्दी झालेली पाहायला मिळते. लकी अली हा ज्येष्ठ अभिनेते मेहमूद यांचा मुलगा आहे.