सलूनमध्ये आलिया कोणत्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती?

हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

Updated: Apr 27, 2018, 06:15 AM IST
सलूनमध्ये आलिया कोणत्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती?

मुंबई : आलिया भट सध्या बॉलिवूडमधली प्रचंड बिझी शेडयुल असलेली अभिनेत्री आहे... तर दुसरीकडे तिची खास मैत्रिण कतरिना कैफला मात्र बॉलिवूडमध्ये काम मिळेनासं झालंय. कतरिनाकडे सिनेमांची कमी आहे तर दुसऱ्या बाजूला तिची बेस्ट फ्रेण्ड आलियाकडे सिनेमांच्या ऑफर जास्त आणि वेळ कमी अशी अवस्था झालीय. आलिया भट्ट सारखी सुंदर अॅक्ट्रेस जेव्हा तिच्या फॅन्सला भेटते तेव्हा तिची एनर्जी बघण्यासारखीच असते. गेल्या रात्री आलियाला तिच्या आईसोबत एका सलुनमध्ये पाहिलं गेलं. बिचाऱ्या आलियावर कामाचं एवढं प्रेशर असूनही ती नेहमीच हसत असते.

शुटिंगमध्ये बिझी असल्यामुळे आलियाकडे स्क्रिप्ट वाचण्यासाठीही वेळ नाहीय. म्हणूनच बिचाऱ्या आलियाला सलूनमध्ये स्क्रिप्ट  वाचावी लागतेय.

आलिया सलूनमधून बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एका सिनेमाची स्क्रिप्ट होती. त्यामुळे हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

आलिया सलूनमधून बाहेर येताच मीडियाला पोज देऊन लगेच कारमध्ये बसली... एक आलिया आहे जिला कामातून वेळ मिळत नाही आणि एक आहे आलियाची बेस्ट फ्रेण्ड जिच्याकडे वेळचं वेळ आहे...