Shahrukh Khan Pathan Movie Contraversy: शाहरुख खानचा (shahrukh khan) 'पठाण' (Pathan) चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. "बेशरम रंग" हे पठाण चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या गाण्यात दीपिका पादुकोनने (deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर चांगलाच वाद झाला. हिंदू संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर पठाण मधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरून शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन वादात सापडले आहेत. या गाण्यात दीपिकाचा बोल्ड लूक दाखवण्यात आला आहे. या गाण्यातील हॉट आणि बोल्ड सिन्स तसेच दीपीकाच्या आउटफिट्सबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जातेय. त्यामुळे हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. हा सर्व वाद सुरु असतानाच आता सर्टिफिकेशन बोर्ड अर्थात सेंसर बोर्ड पठाण चित्रपटातील गाण्यावर कात्री फिरवणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेताना सेन्सॉर बोर्डाने चित्रपट बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार यात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी याबाबत माहिती दिली.
‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करत आहे. यामुळे त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत.
पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदी संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे.
'पठान' चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे अश्लील पद्धतीने परिधान केले आहेत. गाण्याचे बोल देखील बेशरम रंग असं आहेत. हा हा भगवा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. ज्या भगव्याने संपूर्ण देशाला आणि जगाला दिशा देण्याचे काम केले त्याला निर्लज्ज रंग म्हटले जात आहे. सेन्सॉर बोर्डने हे गाण प्रदरर्शित करण्याला कशी काय परवानगी दिली असा सवाल हिंदू संघटनांनी उपस्थित केला होता. या गाण्याचे बोल आणि दीपिकाचा ऑऊटफिट चेंज करावा अन्यथा सिनेमागृहांमध्ये चित्रपट तालू देणार नाही असा इशारा देखील हिंदू संघटनांनी दिला होता.