मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात अनेक सिनेमांना गौरवण्यात आलं. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी 'सवाल माझा ऐका' या थुकरटवाडीच्या LIVE कार्यक्रमात गेस्ट म्हणून दादा (अर्थात अजित पवार) पोहोचले आहेत. कार्यक्रमाचा विषय, 'येणार आहेत गेस्ट, ठरवणार कुठला सिनेमा बेस्ट'
काका आणि पुतण्याचे काय नाते असते, त्यावर विनोदी अंगाने टिपन्नी करण्यात आलेय. थोरा-मोठ्यांना नेहमी पाया पडा, असे सांगत दादा म्हणतात, असू द्या, असू द्या. यावेळी दादा खूपच संतापलेत. ग्रामीण भागातून लांबून माणसं भेटायला आलेली आहेत. त्यापेक्षा अशा फालतू कार्यक्रमावर चर्चा करणे योग्य नाही. महत्वाच्या विषयावर चर्चा केली असती तर मला जरा बरं वाटेल, असं सांगत त्यानी नव्या विषयात लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी सचिन खेडेकर यांना थेट सवाल करत, मला सिनेमात हिरोचा रोलमध्ये घेतले असेत तर चाललं असतं. त्यांच्याच तोंडून मग ऐका...