मुंबई : अनेक मोठ्या कार्यक्रमात, उद्योगपती यांच्या घरात लग्नकार्य असेल, तर सेलिब्रिटी परफॉर्म करतात. पण अभिनेता चंकी पांडेला तर चक्क शोकसभेत रडण्यासाठी 5 लाख रूपयांची ऑफर आली होती . हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल. पण खुद्द चंकी पांडे यांनी हा किस्सा सांगितला आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. 2009 साली चंकी पांडे यांना मुलुंडमधील एका उद्योगपती कुटुंबाने वारसाच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी विनंती केली.
यामागचं कारण देखील चंकी पांडे यांनी सांगितलं, 'त्या कुटुंबाने ही गोष्ट फक्त प्रसिद्धीसाठी केली. कुटुंबाने चित्रपटांमध्ये गुंतवणूक केली आहे. असं त्यांना जामलेल्यांना भासवून द्यायचं होतं. त्यामुळे त्यांना कर्ज परतफेड करावा लागणार नाही. हे ऐकल्यानंतर मी चकित झालो. मी जागीचं बेशुद्ध पडलो. '
पुढे म्हणाले, 'मला त्याठिकाणी रडायचं होतं. संपूर्ण कार्य होईपर्यंत मला एका कोपऱ्यात उभं राहाचं. कारण कर्ज देणाऱ्यांना असं वाटावं की, ते कुटुंब काही अभिनेत्यांसोबत मिळून चित्रपट करत आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने मला 5 लाखांची ऑफर देखील दिली. पण मी त्यांना नकार दिला आणि माझ्या जागी दुसऱ्या कोणाला पाठवलं. '
चंकी पांडे यांनी शोकसभेला कोणाला पाठवलं हे सांगितलं नाही. 'एका जागी उभं राहाण्यासाठी 5 लाख प्रचंड मोठी ऑफर आहे. मला अभिनय करायचं आहे. पण फक्त चित्रपटांमध्ये कोणत्याही शोकसभेत नाही.' असा धक्कादायक खुलासा चंकी पांडे यांनी एका मुलाखतीत केला.
चंकी पांडे यांनी 1988 मध्ये 'पाप की दुनिया' आणि 'खतरों के खिलाडी', 1990 मध्ये 'जहरीले',1992 मध्ये 'आंखे' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. 1988 च्या लोकप्रिय 'तेजाब' सिनेमांत अनिल कपूरच्या मित्राची भूमिका साकारली. ज्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. पण अगदीच 90 च्या दशकात त्यांच करिअर संपलं.