कपिल शर्माशी लग्न करण्याचं हे होतं खरं कारण? पत्नीकडून गौप्यस्फोट, पाहा व्हिडीओ

गडगंज संपत्ती असूनही स्कुटर चालवणाऱ्या कपिल शर्माशी का केलं लग्न, पत्नीनं दिलं उत्तर

Updated: Jan 25, 2022, 07:58 PM IST
कपिल शर्माशी लग्न करण्याचं हे होतं खरं कारण? पत्नीकडून गौप्यस्फोट, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: भल्या भल्यांची फिरकी घेणाऱ्या कपिल शर्माची बोलती बंद झाली. जेव्हा त्याच्या पत्नीनं त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबाबत गौप्यस्फोट केला. श्रीमंत आणि घरची चांगली परिस्थिती असताना कपिल शर्मासोबतच लग्न करण्याचा का निर्णय घेतला यावर त्याच्या पत्नीनं उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर कपिल शर्माचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

कॉमेडी किंग कपिल शर्माचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. त्याचा कॉमेडी नाईट विथ कपिल शो खूप प्रसिद्ध झाला. सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीवर उत्तर तयार असलेल्या कपिलची बोलती त्याच्या पत्नीनं बंद केली. कपिलची पत्नी त्याच्यापेक्षाही कॉमेडीमध्ये उस्ताद निघाली. 

कपिलची पत्नीही त्याच्यापेक्षा कमी नाही आणि लवकरच तुम्हाला याची कल्पना येईल. कपिल शर्माची पत्नी गिन्नीने नेटफ्लिक्सच्या मंचावरच जे उत्तर दिलं त्यानं उत्सुकता वाढली आहे. कपिल शर्माचा एक शो 28 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचा भेटीला येत आहे.  'कपिल शर्मा: आय एम नॉट डन स्टिल' असं याचं नाव आहे. स्टॅण्डअप कॉमेडीमधील एक छोटासा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कपिलने गिन्नीला विचारलं की तू एवढे श्रीमंत असूनही बाईकस्वार कपिलशी लग्न का केलं? त्यावर गिन्नीनं भन्नाट उत्तर दिलं आहे. गिन्नी म्हणाली की या गरीबाचं भलं व्हावं असं वाटलं म्हणून लग्न केलं. गिन्नीच्या या उत्तरानंतर उपस्थित चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला होता. अभिनेता 'कपिल शर्मा: आय एम नॉट डन स्टिल' या कॉमेडी स्पेशलसह नेटफ्लिक्सवर त्याच्या बहुप्रतिक्षित स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. 28 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

कपिल शर्माने यावेळी आपलं प्रेम आणि लग्नाचे किस्से सांगितले आहेत. गिन्नी आणि कपिलनं 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. कपिल शर्मानेही त्याची प्रेमकहाणी अतिशय अप्रतिम पद्धतीने सांगितली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)