नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले. या क्षण त्यांच्यासाठी काही खास आहे. या आत्मचरित्राचे अनावरण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली.
हेमा यांच्या आत्मचरित्राचे लेखन 'स्टारडस्ट' चमाजी संपादक आणि निर्माते राम कमल मुखर्जी यांनी केले आहे. पुस्तकात हेमा यांचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या सगळ्याचा उल्लेख आहे. याची प्रस्तावना खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आत्मचरित्र लिहिले आहे.
आत्मचरित्राचे अनावरण हेमा यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. १९६८ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या 'ड्रीम गर्ल'ने चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केली. 'सपनों के सौदागर' या पहिल्या चित्रपटात हेमा, राज कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. त्यानंतर 'जॉनी मेरा नाम' यात त्या देवानंद यांच्यासोबत दिसल्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि तेव्हापासूनच त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.