मुंबईः दीपिका पदुकोण यंदा 75व्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जुरी सदस्य होती. कान्समध्ये तिनं यंदाही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवला. नुकतीच तिने ऑरेंज कलरचा गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर हजेरी लावली, पण या गाऊनमुळे दीपिका सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली
दीपिका ऑरेंज गाऊनमध्ये प्रचंड अस्वस्थ दिसली. ड्रेस सांभाळताना दीपिकाची मोठी कसरत सुरु असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने म्हटलंय की 'आता डिझायनरची नोकरी गेली', तर दुसरा एक जण म्हटला की, 'चला कार्पेट झाडून तर झालं'.
दीपिका पदुकोण रेड कार्पेटवर ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये दिसली. तिचा मेक-अप, हेअरस्टाईल सगळं छान होतं, पण ड्रेसनेच सगळं बिघडलं. खरंतर हा ड्रेस दीपिकाला खूप छान दिसत होता, पण ती पूर्ण वेळ फक्त ड्रेस सांभाळत राहिली.
सोशल मीडियावर दीपिकाच्या फोटोंचा बोलबाला आहे. ती ज्युरी मेंबर्ससोबत पोज देताना दिसत आहे. यादरम्यान तिने एका हाताने तिचा ड्रेस पकडलेला दिसत आहे.
दीपिकाचा हा लूक समोर येताच चाहत्यांनीही व्हिडिओवर जोरदार कमेंट करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, 'फॅशनलाही किंमत मोजावी लागते.' दुसर्याने टिप्पणी केली, 'लोक अशा प्रकारचे कपडे का घालतात?' एकजण म्हणाला, 'हे माझ्या बाईकचे कव्हर आहे.'