दीपिका पादुकोण पुन्हा हॉलिवूडमध्ये

'पद्मावती' या चित्रपटासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचीदेखील चर्चा वाढत आहे.

Updated: Nov 4, 2017, 10:28 AM IST
दीपिका पादुकोण पुन्हा हॉलिवूडमध्ये  title=

मुंबई : 'पद्मावती' या चित्रपटासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचीदेखील चर्चा वाढत आहे.

शाहीद कपूर, दीपिका आणि रणवीर सिंग यांचा 'पद्मावती' चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. 

 'पद्मावती'नंतर दीपिका बॉलिवूडची नव्हे तर हॉलिवूडची पुढची फिल्म हातात घेणार आहे. 'XXX: Return Of Xender Cage'हा दीपिकाचा हॉलिवूड सिनेमा यंदा रसिकांच्या भेटीला आला होता. विन डिजेलसोबतच्या या चित्रपटाचा सिक्वेलदेखील लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

'रिटर्न ऑफ जेंडर केज' या चित्रपटामध्ये दीपिकाचा रोल फार मोठा नसला तरीही लोकांना तिची भूमिका आवडली होती. लवकरच  'XXX: Return Of Xender Cage'च्या सिक्वेलच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटामध्ये पूर्वीपेक्षा तिची भूमिका मोठी आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी या चित्रपटाबाबतचे ट्विट केले आहे. 

सध्या दीपिका पादूकोण 'पद्मावती'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ३डी स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला तसेच 'घुमर' या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी अल्पावधीमध्ये प्रचंड प्रतिसाद दिला आहे.