मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे दिवसाला हजारो रूग्णांना आपल्या जीवाची आहूती द्यावी लागत आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनामुळे सर्वचं त्रस्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. कोणी ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत, तर कही फंड गोळा करण्यात व्यस्त आहेत. अशात अभिनेत्री दीपिका पादुकोनने मानसिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
कोरोना काळात जे मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी दीपिकाने मेंटल हेल्पलाईन नंबर शेअर केले आहेत. हेल्पलाईन नंबर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मी आणि माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आपलं मानसिक आरोग्य देखील चांगलं असण्याची गरज आहे.'
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका लवकरचं '83' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.