'दिल धडकने दो' अभिनेत्री दिव्या सेठ शाह तिची मुलगी मिहिका शाह गमावल्यानंतर खूप भावूक झाली आहे. दिव्या सेठने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. मिहिका शाहचे वयाच्या 20 व्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. मिहिका शाहचं निधन अगदी अचानक झालं आहे. आधी तिला ताप आला नंतर तिला चक्कर आली, यामध्ये तिचा मृत्यू झाला.
अभिनेत्री दिव्या सेठने लेकीच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. दिव्या सेठने मुलगी मिहिकासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये मनापासून प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. ही पोस्ट एका आईची भावना व्यक्त करते.
जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मी अतिशय निखळ प्रेम अनुभवते. तुझ्यासारख्या जखमी व्यक्तीला तू भेटावस आणि बरं करावसं, दिव्या तू देवाची भेट आहेस. माझा आशिर्वाद आहे तुझ्या प्रेमामुळे मी अधिक कठोर होत आहे. 8.1 दशलक्ष पृथ्वीवरील लोकांमध्ये तुझ्यासारखी आई नाही. माझी दिबी. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
पुढे ती म्हणाली की, या किंवा पुढच्या कोणत्याही आयुष्यात तू प्रेम केलंस तसं कुणीही करणार नाही. मला आशा आहे, तू मला पाहशील. मी अजून स्ट्राँग होईन असा शब्द तुला देते. मी ते सगळं करेन जो प्लान आपण केला होता. तुला समुद्रावर घेऊन जाईन. जंगलात फिरू हनी...
अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांची मुलगी मिहिका शाह हिचे 5 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. याची माहिती अभिनेत्रीने एका पोस्टद्वारे दिली होती. आपल्या दिवंगत मुलीच्या स्मरणार्थ गुरुवारी संध्याकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर सांगितले. दिव्या आणि तिचा पती सिद्धार्थ शाह यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी मिहिका शाहच्या निधनाची माहिती दिली.
या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. आलिया भट्टची आई सोनी राजदान, अनुष्का रंजन आणि आहाना कुमराने रेड हार्ट इमोजी बनवल्या, तर रोनित बोस रॉय यांनी लिहिले, "परमेश्वराचे आशीर्वाद राहोत. रिपोर्ट्सनुसार, मिहिकाला आधी ताप आला आणि नंतर स्ट्रोक आला, ज्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.