मुंबई : भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हा विजय फक्त आणि फक्त हरनाझ कौर संधूमुळे भारताला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. हा दिवस सर्व भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी फक्त सौंदर्याची गरज नसते. तर बुद्धी आणि कैशल्याची देखील नितांत गरज असते. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी अखेरीस एक प्रश्न विचारण्यात येतो.
हरनाझ कौर संधूला देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचं उत्तर हरनाझ कौर संधू तितक्याचं चातुर्याने दिलं. विश्वसुंदरीला विचारण्यात आलेला प्रश्न, ' सध्याच्या यंग महिला कोणता प्रेशर फेस करतायत आणि त्यांना तू काय मार्गदर्शन करशील?'
या प्रश्नावर हरनाझ कौर संधूने दिलेलं सुंदर उत्तर...
हरनाझ कौर संधू म्हणाली, 'युवकांवर सगळ्यात मोठं प्रेशर आहे तो म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणं...दुस-याशी तुलना करणं सोडून द्या. स्वत:बद्दल बोला. कारण तुमच्या आयुष्याचे तुम्हीच लीडर आहात तुम्हीच तुमचा आवाज आहात...मी माझ्यावर विश्वास ठेवते आणि म्हणूनच मी आज या मंचावर आहे.'
कोण आहे हरनाझ संधू?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे.