मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिची नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून सुटका झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केल्यावर सर्वत्र महिमाच्या चर्चेला उधाण आलं होतं.
दरम्यान, आता महिमा चौधरीने सांगितलं आहे की, जेव्हा ती कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून जात होती. तेव्हा तिला कुरुक्षेत्र या चित्रपटातील स्टारकास्ट संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांच्याकडून खूप धैर्य मिळालं होतं.
संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांनी धीर दिला
अलीकडेच महिमा चौधरीने एका मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की, 'जेव्हा मी कॅन्सरशी झुंज देत होते, तेव्हा अनेकदा असं वाटलं होतं की, मी हार मानेन. पण नंतर मला बॉलीवूड अभिनेते संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांचा विचार आला, कारण हे दोन्ही अभिनेते देखील कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांनी त्यांचे धैर्य कायम ठेवलं, ज्याच्या अंतर्गत तिने कर्करोगावर विजय मिळवला. संजयला फुफ्फुसाचा कर्करोग होता.
या दोन्ही कलाकारांकडून मला प्रेरणा मिळाली. ज्याच्या मदतीने मीही कॅन्सरशी लढा जिंकू शकले. पण किती विचित्र गोष्ट आहे की कुरुक्षेत्र या चित्रपटात मी संजय आणि महेश एकत्र होते आणि त्यानंतर आम्हा तिघांनाही कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं.
या अभिनेत्रींकडून उत्साह वाढला
केवळ कुरुक्षेत्र स्टार्स संजय दत्त आणि महेश मांजरेकरच नाही तर महिमा चौधरीची मैत्रिणी सोनाली बेंद्रे आणि मनीषा कोईराला यांनाही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कॅन्सर झाला आहे. यावर बोलताना महिमा चौधरी म्हणाली, 'या दोघांच्या कॅन्सरच्या प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि मी कॅन्सरला हरवू शकले.'