Ekta Kapoor on Babysitting: यावर्षीचा एमी पुरस्कार हा वीर दास आणि एकता कपूर यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. यावेळी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचेही प्रचंड कौतुक होताना दिसते आहे. एकता कपूरचीही बरीच चर्चा आहे. त्यातून तिनं यावेळी आपल्या वडीलांचे आणि भावाचे खास आभार मानले आहेत. पुरस्कार स्विकारताना परदेशात गेलेली असताना एकता कपूरचा मुलगा हा एकटा होता तेव्हा त्याचा सांभाळ हा जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी केल्यानं यावेळी एकता कपूरनं त्या दोघांचे विशेष आभार मानले आहेत. आपल्या भाषणातून तिनं यावेळी त्यांचे नावं घेत त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी आपला पुरस्कार स्विकारल्यानंतर तिनं आपल्या भावाचे आणि वडिलांचे आभार मानले आहेत.
एकता कपूरला लहानगा मुलगा आहे. त्याचे नाव हे रवी आहे. यावेळी ती म्हणाली की, ''मला यावेळी माझ्या आयुष्यातील पुरूषांचे आभार मानायचे आहेत. माझे वडिल आणि माझा भाऊ... त्यांनी सध्या माझ्या मुलाला सांभाळायची जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनी वेळोवेळी गरजेला माझ्या घराची साथ दिली आहे. या दोघांचे मला आभार मानायचे आहेत. यावेळी मला मुलगा रवि आणि माझा भाचा लक्ष्य यांचे मला आभार मानायचे आहेत. त्यातून यावेळी मी सिंगल मदर आहे. परंतु या सगळ्या मुलांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे.''
हेही वाचा : VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा
एकता कपूर हिनं आपल्या बळावर बालाजी टेलिफिल्म्स सुरू केलं. तिनं टेलिव्हिजन माध्यमात अनेक लोकप्रिय टीव्ही सिरियल्स आणल्या आहेत. त्याचसोबत त्यांची आजही चर्चा होती. तिनं अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या याच यशाकडे पाहून एमीनंही तिच्या कामाची आणि कर्तृत्वाची दखल घेतली आहे. त्यामुळे तिचीही यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ती एक सिंगल मदर आहे. सोबतच सेरोगसीद्वारे तिनं रवी या तिच्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
नुकताच तिचा Thank You For Coming हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैंकी कामगिरी केली. या चित्रपटाला ट्रोलही करण्यात आले होते. टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही हा चित्रपट तूफान गाजला. कपूर कुटुंबियांनीही या चित्रपटाची निर्मिती केली होती.