Ayesha Jhulka On Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा सामाजिक कार्यात (Social Work) नेहमीच अग्रेसर असतो. सलमान आपल्या चॅरिटेबल फाऊंडेशनच्या (Being Human Foundation) माध्यमातून अनेक लोकांना विविध प्रकरारची मदत करत असतो. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी सलमान अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच सलमान खानसोबत फिल्मी करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री आयशा झुल्काने (Ayesha Jhulka) सलमान खानबात एक किस्सा शेअर केला आहे.
आयेशा झुल्काने नुकतीच एक मुलाखत (Interview) दिली होती. या मुलाखतीत तीने सलमानचं कौतुक केलं आहे. सलमान हा हळव्या मनाचा असून गरजूंना तो नेहमीच मदत करत असतो. आयशाच्या म्हणण्यानुसार, तिचा सलमानसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. सलमान एक चांगली व्यक्ती आहे, इतकंच नाही तर अडल्या नडलेल्यांना तो वेळोवेळी मदत करत असल्याचंही तीने या मुलाखतीत सांगितलं.
आयेशा या मुलाखतीत म्हणते मी आधीपासूनच सलमान खानची खूप मोठी फॅन राहिली आहे. कारण तो खूप चांगला अभिनेता तर आहेच पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने तो चांगला माणूस आहे. आपल्या मुलाखतीत आयेशाने चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला.
चित्रीकरणादरम्यान सेटवर अनेकवेळा जेवण उरत असे, पण सलमान ते अन्न वाया जाऊ देत नसे, कोणाला तरी शोधून ते जेवण त्यांना देत असे. अनेकवेळा शुटिंगवरुन घरी जाताना मध्यरात्र व्हायची. पण सलमान उरलेलं सर्व अन्न पॅक करयाचा आणि वाटेत गरजूंना दान करायचा. फूटपाथवर झोपलेल्या लोकांना त्यांनी अनेकदा जेवण दिलं आहे. सलमान हा सामाजिक भान असलेला माणूस आहे आणि एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहे यात शंका नाही असंही आयेशाने म्हटलं आहे.
आयशाने 'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिकंदर' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्राइम व्हिडिओच्या 'हुश हुश्श' या मालिकेतून तिने नुकतंच पुनरागमन केलंय.