मुंबई : काही दिवसांपूर्वी, आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबरने त्याच्या चाहत्यांना सांगितलं की, तो रॅमसे हंट सिंड्रोमचा शिकार झाला आहे. आता टीव्ही मालिका 'सास बिना ससुराल' अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा हिने खुलासा केला आहे की, तिला 2014 मध्ये रामसे हंट सिंड्रोमचं निदान झालं होतं.
या आजारामुळे तिचा अर्धा चेहरा अर्धांगवायू झाल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. ती टीव्ही शो 'मैं ना भूलूंगी'चे शूटिंग करत असताना हा प्रकार घडला. या आजारामुळे तिला चेहरा नीट स्वच्छ धुताही येत नव्हता.
ऐश्वर्याने पुढे सांगितलं की, माझी स्थिती पाहून माझी मैत्रिण पूजाला माझ्या चेहऱ्यात काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं आणि तिने मला डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर ती डॉक्टरांना भेटली आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर अर्धांगवायू झाल्याचं समोर आलं. तिला रामसे हंट सिंड्रोमचं निदान झालं. त्यानंतर तिला स्टिरॉइड्स देण्यात आलं.
अभिनेत्रीने सांगितलं की स्टेरॉईड्सच्या मदतीने ती 1 महिन्यात पूर्णपणे बरी झाली. एमडी (मेड), डीएम (कार्डियो) एम्स, एफसीएसआई की वरिष्ठ इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट, एसोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन डॉ जगदा नंद झा, आम्हाला या आजाराबद्दल सांगितलं.
रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?
हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे चेहऱ्यावर अशक्तपणा येतो आणि कान किंवा तोंडावर पुरळ उठते. चेहऱ्याचा पक्षाघात, तोंड किंवा कानाभोवती पुरळ येणे आणि चेहर्याचा अशक्तपणा किंवा पॅरेलाइज ही या स्थितीची मुख्य लक्षणं आहेत. लक्षणं सहसा चेहऱ्याच्या एका बाजूला प्रभावित करतात.