'बाबा मला तुमची खूप आठवण येते' आदिनाथ कोठारेची भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का

आदिनाथने '८३' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आदिनाथ सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमी तो स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच आदिनाथने एक फोटो शेअक केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.

Updated: Mar 22, 2023, 07:57 PM IST
'बाबा मला तुमची खूप आठवण येते' आदिनाथ कोठारेची भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का  title=

मुंबई : अभिनेता आदिनाथ कोठारे हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे, ज्याने प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केलं आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पाणी' या मराठी चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याचे वडील महेश कोठारे हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. 

आदिनाथने '८३' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आदिनाथ सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमी तो स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच आदिनाथने एक फोटो शेअक केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे

आदिनाथची भावूक पोस्ट
आदिनाथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. गुढीपाडव्याचे आपल्या लेकीसोबत फोटो शेअर करत आदिनाथने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 

जीजा : आज आजोबांचा बड्डे केक कापायचा?
डॅडा : नाही गं
जीजा : त्यांचा तारा झाला असेल का? 
डॅडा : कादाचित
जीजा : शूटिंग स्टार होऊन आपल्याला भेटायला येतील?
डॅडा : शोध आकाशात
जीजा : केवढे तरी तारे आहेत. ह्यात आजोबा कोण?
डॅडा : तुला बघून जो लकलकेल तो
जीजा : तुझे डोळे का लकलकतायेत?
डॅडा : आठवण येतेय
जीजा : तो बघ तारा दिसला
डॅडा : दिसला
जीजा : हॅपी बड्डे आजोबा!
जीजा आणि डॅडा : आणि हॅपी गुढीपाडवा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आदिनाथने शेअर केलेली ही त्यांच्या आजोबांसाठी आहे. अभिनेत्याच्या आजोबांना वर्ष पुर्ण झाल्याने त्याला त्यांची आठवण येतेय असं त्याने पोस्ट शेअक करत म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चंद्रमुखी सिनेमा रिलीज झाला आणि आदिनाथ कोठारे जास्त चर्चेत आला. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात बिनसलं. दोघं वेगळे होणार. सोशल मीडियावर तर या गोष्टींना उतच आला. चंद्रमुखीचा दौलतराव देशमाने लोकांना भावला. पण त्याच वेळी आदिनाथ आणि उर्मिला वेगळे होत असल्याची चर्चा सुरू झाली होती.