मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप

मुलासह आई विरोधातही तक्रार दाखल 

Updated: Oct 17, 2020, 04:18 PM IST
मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली आणि मुलगा महाक्षय यांच्यावर बलात्कार, चीटिंग आणि जबरदस्ती अबॉर्शन करण्याच्या प्रकरणात मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तक्रार १५ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली आहे. पीडित तरुणी एक मॉडेल असून महाशय आणि तरुणी अनेक वर्षे एकमेकांना ओळखत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#mithunchakraborty#mahaakshaychakraborty

A post shared by Mithun Chakraborty (@only_mithun_chakraborty) on

पीडितेने असा आरोप लावला आहे की, २०१५ आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. या कालावधीत महाक्षयने तिला लग्नाचं आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. असा आरोप केला आहे की, महाक्षयने तिला २०१५ साली घरी बोलावलं होतं. सॉफ्ट ड्रिक्सच्या नावाखाली नशेचं औषध टाकून पेय दिलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 

सध्या स्टार प्लसची मालिका अनुपमावरुन चर्चा आहे. या मालिकेत मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्मा हीची जास्त चर्चा आहे. मदालसा शर्मा ही खूपच सुंदर आहे. या शोमध्ये मदालसा अतिशय स्टाईलिश दिसून आली आहे. मालिकेतच नाही तर रियल लाईफमध्ये देखील मदालसा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड आहे. मदालसा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती आकर्षक फोटो शेअर करत असते.

मदालसा शर्मी टीव्ही शोमध्ये अनुपमा म्हणजेच काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी मदालसाला वाहवा मिळत आहे. या शोच्या माध्यमातून त्यांची फॅन फॉलोईंग देखील वाढत आहे. मदालसा शर्माचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून असल्यानेही मदालसा ही चर्चेत असते.