नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अक्षयने विविध पद्धतीने प्रमोशन केले होते. त्यामुळेच की काय पण चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली.
आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटी रुपयांची कमाई केली. या चिपटाचा विषय अतिशय निराळा पण सामान्य आहे. महिलांना येणाऱ्या मासिक पाळीवर हा सिनेमा भाष्य करतो. ॉ
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी केलेल्या ट्वीटनुसार अक्षयच्या पॅडमॅनने सुरुवातीलाचा १० कोटींचा गल्ला केला. अजून वीकेंड बाकी असल्याने चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. सुरूवातीला हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र संजय लीला भन्साळींच्या पद्मावतमुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. म्हणून हा चित्रपट काल म्हणजे ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.
ओपनिंग चांगली मिळाल्याने चित्रपटाकडून उत्तम कमाईच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. आता सत्य घटनेवर आधारित या चित्रपट प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Early estimates for @akshaykumar 's #Padman Day 1 All-India nett has come in.. It's ₹ 10 Crs..
Decent Number for Day 1 given the subject.. Should see good growth today and tomorrow.. (Sat and Sun)
— Ramesh Bala (@rameshlaus) February 10, 2018