Gashmeer Mahajani : गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील महाजनी कुटुंब चर्चेत आहे. रवींद्र महाजनी यांचं 15 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. इतकंच नाही तर त्यांचा मुलगा गश्मीरला अनेकांनी ट्रोल देखील केले होते. रवींद्र महाजनी हे गेल्या 20 वर्षांपासून कुटुंबापासून लांब राहत होते. त्यांना एकट्यात त्यांचं आयुष्य जगायला आवडायचं. स्वत: ची काम स्वत: करण्यापासून इतर गोष्टी देखील... त्यांचा सुंदरतेनं आणि उत्तम अभिनयानं सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या रवींद्र यांचे अचानक निधन झाल्यानं सगळ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. आता गश्मीरनं त्यांची बाजू सगळ्यांसमोर मांडली आहे.
गश्मीरनं वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर पहिल्यांदा एक मुलाखत दिली. ही मुलाखत गश्मीरनं सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत वडिलाची ती दुसरी बाजू सांगितली आहे जी कोणाला माहित नव्हती. 'वडिलांची राहण्याची पद्धतच वेगळी होती. ते 20 वर्षांपासून वेगळेच रहायचे. त्यांना हवं तेव्हा ते आम्हाला घरी भेटायला यायचे आणि 2 महिने राहून परत निघून जायचे. त्यांना एकटं स्वतंत्र रहायला आवडायचं. आधी ते मुंबईतल्या फ्लॅटमध्ये त्यानंतर तळेगावला राहायला गेले. त्यांना कोणी केअरटेकरही नको होता. स्वत:ची काळजी स्वत:च घेणार असा त्यांचा स्वभाव होता. अगदी स्वयंपाकही ते स्वत:च करायचे,' असं गश्मीरनं सांगितलं.
हेही वाचा : 'भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही...'; किरण मानेंचा सूचक इशारा
पुढे गश्मीर त्याला मुलगा झाल्याची बातमी रवींद्र यांना सांगितलं तेव्हा त्यांनी काय केलं याविषयी सांगित म्हणाला, 'मला मुलगा झाला तेव्हा मला वाटलं की नातवाला आजोबांचा सहवास लाभावा. त्यांनी नातवाचा चेहरा फक्त त्याच्या जन्माच्या वेळी पाहिला होता. त्यामुळे मी आणि आईनं त्यांना घरी या अशी बरीच विनंती केली. पण ते आलेच नाहीत. मी त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलाचे फोटो, व्हिडिओ पाठवायचो. ते पाहून तरी ते घरी येतील त्यांचं मन विव्हळेल असं मला वाटलं. मात्र त्यांनी मला ब्लॉक केलं. आईनं फोन केलं तर तिलाही ब्लॉक केलं. त्यानंतर माझ्या बायकोलाही ब्लॉक केलं. आता त्यांनी असं का केलं असेल हेही मी सांगू शकतो. फोटो पाहून ते हळवे होणार त्यांना यावंसं वाटणार नातवाला आजोबांची सवय होणार हे सगळं त्यांना नको होतं म्हणून त्यांनी आम्हाला ब्लॉकच करुन टाकलं.'