Highest Paid OTT Actors In India: सध्या अनेकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेड लागले आहेत. कोविड-19 नंतर OTT प्लॅटफॉर्मचे जग खूप मोठे झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना OTTवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सिरीज बघायला मिळतात. OTT वर मोठ्या प्रमाणात चित्रपट, वेब सीरिज उपलब्ध आहेत. काही लोकांना सामग्री अगदी सहज सापडते तर इतर सामग्री शोधण्यात काही लोक बराच वेळ घालवतात. लोक घरी बसून देखील OTT प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपटांचा आनंद घेतात.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी OTT प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. OTTच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कलाकारांची कमाईही गगनाला भिडू लागली आहे. OTTवर कोणते कलाकार सर्वाधिक फी घेतात. OTT वरील सर्वात महागडा सुपरस्टार कोण? जाणून घेऊयात सविस्तर
अजय देवगन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन 3 दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अजय देवगनने 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजसाठी 125 कोटी रुपये मानधन घेतले होते. अजय देवगन त्याच्या मोठ्या प्रोजेक्ट्ससाठी मोठी रक्कम घेतो. अजय देवगनने या वेब सीरिजद्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश केला आहे.
पंकज त्रिपाठी
OTT प्लॅटफॉर्म पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय अपूर्ण आहे. मिर्झापूर फ्रँचायझीमधील कालीन भैया या व्यक्तिरेखेने पंकज त्रिपाठी हे लोकप्रिय झाले आणि त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी हे एका OTT प्रोजेक्टसाठी12 कोटी रुपये घेतात.
करीना कपूर
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता ती OTT प्लॅटफॉर्मवर तिच्या प्रोजेक्टसाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
मनोज बाजपेयी
अभिनेता मनोज बाजपेयी यांनी OTT प्रकल्पांवर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'फॅमिली मॅन' आणि 'साइलेंस' अशा अनेक शोमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी 10 कोटी रुपये घेतात.