70th National Film Awards: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 16 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा अनेक चित्रपटांनी आणि कलाकारांनी यामध्ये बाजी मारली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना दिली जाणारी बक्षीसाची रक्कम किती असते. चला तर मग जाणून घेऊयात.
देशातील सर्वोच्च सिनेसृष्टीतील सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना 15 लाखांच्या बक्षीसासह देण्यात येतो. यानंतर स्वर्ण कमल किंवा सुवर्ण कमळ पुरस्कार विजेत्यांना रोख 3 लाख रुपये पारितोषिक दिले जाते. रजत कमल (रौप्य कमळ) विजेत्यांना विविध श्रेणींमध्ये 2 लाख रुपये दिले जातात.
स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांची यादी, यांना रोख 3 लाख पारितोषिक मिळेल
1. सर्वोत्कृष्ट चित्रपट: अट्टम (दिग्दर्शक: आनंद एकरशी, निर्माता: अजित जॉय)
2. दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: फौजा (दिग्दर्शक: प्रमोद कुमार)
3. सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट: कांतारा (निर्माता: विजय किरगांडूर, दिग्दर्शक: ऋषभ शेट्टी)
4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ऊंचाई ( दिग्दर्शक: सूरज बड़जात्या )
5. ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ब्रह्मास्त्र-भाग 1: शिवा (प्रॉडक्शन हाऊसेस: धर्मा प्रोडक्शन्स, प्राइम फोकस, स्टारलाईट पिक्चर्स; दिग्दर्शक: अयान मुखर्जी)
रजत कमल पुरस्कार विजेत्यांची यादी, यांना 2 लाख रोख पारितोषिक मिळेल
1. सर्वोत्कृष्ट अभिनेता: कांतारा साठी ऋषभ शेट्टी
2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: थिरुचित्रम्बलम (तमिळ) साठी नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस (गुजराती) साठी मानसी पारेख
3. सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: फौजा (हरयाणवी) साठी पवनराज मल्होत्रा
4. सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: 'ऊंचाई'साठी नीना गुप्ता
5. सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक: ब्रह्मास्त्र-भाग 1 मधील केसरियासाठी अरिजित सिंग : शिव
त्यासोबतच मनोज बाजपेयी आणि संगीत दिग्दर्शक संजय सलील चौधरी यांना प्रमाणपेत्री दिली जाणार आहेत. परंतु त्यांच्या विशेष उल्लेखासाठी यामध्ये रोख पारितोषिक नाही. अभिनेत्याला गुलमोहर (हिंदी) मधील कामासाठी, तर संजय सलील चौधरी यांना कधिकन (मल्याळम) मधील योगदानासाठी सन्मानित केले जाईल.