लग्नाच्या चर्चांनंतर बॉयफ्रेंडसोबत 'या' ठिकाणी पोहोचली आमिरची लेक

आमिरच्या लेकीचा बोल्डनेस  वाढतोय, बॉयफ्रेंडसोबत 'या' ठिकाणी दिसल्यानंतर चर्चांना उधाण  

Updated: Jul 29, 2022, 09:27 AM IST
लग्नाच्या चर्चांनंतर बॉयफ्रेंडसोबत 'या' ठिकाणी पोहोचली आमिरची लेक  title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. आता देखील आयरा आणि नुपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपूर एका रेस्टॉरंटमध्ये जात आहेत. यावेळी जमलेल्या सर्वांची नजर फक्त आयरा आणि नुपूरवर आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, आजराचा एका खास व्यक्तीसोबत फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये आयरा तिची आजी झीनत हुसैनसोबत दिसत आहे. आमिरच्या मुलीने आजीला तिच्या प्रियकराची भेट घडवून आणली. ज्यानंतर लोकं विचारत आहेत की, दोघं लग्न करणार आहेत का? आता आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूरची आजी झीनत हुसैन यांच्याशी ओळख करून दिली आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आयराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'रँडम फोटो बॉम्ब'. आयरा, नुपूर आणि झीनत या तिघीही फोटोमध्ये आनंदी दिसत आहेत. पण आद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे नुपूर शिखरे
नुपूर शिखर एक फिटनेस ट्रेनर आहे, तो आयरा खानला ट्रेनिंग देत आहे. नुपूर अभिनेता आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊन दरम्यान आयरा आणि नुपूरने एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.