Rinku Singh and Priya Saroj: टीम इंडियाचा धाकड बल्लेबाज रिंकू सिंग आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रिंकू सिंग हा सपा खासदार प्रिया सरोज हिच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच रिंकूची लव्हस्टोरीही (How Rinku Singh met with Priya Saroj) खूप रंजक आहे. प्रियाच्या आमदार वडिलांनी रिंकू आणि प्रियाच्या नात्याबद्दल सांगितले आहे. प्रियाचे वडील तुफानी सरोज हे केरकटमधून सपा आमदार आहेत. त्यांनी या दोघांचे लग्न कसे ठरले याबाबतीत सांगितले आहे.
प्रियाचे वडील तुफानी सरोज यांनी सांगितले की, "अजून साखरपुडा किंवा रोका झालेला नाही." तुफानी सरोज यांची मुलगी प्रिया आणि रिंकू यांची भेट एका मैत्रिणीमार्फत झाली. ते पुढे म्हणाले, "रिंकू आणि प्रिया एकमेकांना एका वर्षाहून अधिक काळापासून ओळखतात. दोघेही एकमेकांना पसंत करत होते पण लग्नासाठी घरच्यांची संमती आवश्यक होती. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबे तयार आहेत."
हे ही वाचा: कशी दिसायची हुस्न की मल्लिका 'अनारकली'? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिगढमधील ओझोन सिटी येथील रिंकूच्या घरी दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि त्यांनी भेटवस्तू आणि शगुनांची देवाणघेवाण करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. लग्न लखनौमध्ये होणार आहे. रिंकू 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर तो आयपीएलमध्येही खेळणार आहे.
हे ही वाचा: Video : बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल
प्रिया सरोज ही वाराणसीच्या रहिवासी असून, दीर्घकाळापासून ती सपाशी संबंधित आहेत. गेल्या वर्षी तिने जौनपूर जिल्ह्यातील मच्छिलशहर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि ही निवडणूक ती जिंकली होती. एवढेच नाही तर ती सुप्रीम कोर्टाची माझी वकीलही आहे. तिने 2022 च्या विधानसभा निवडणुकीतही वडिलांचा प्रचार केला होता. दिल्ली विद्यापीठातून कला पदवीधर असलेल्या प्रियाने नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे.