मुंबई : शनिवारी घोषित करण्यात आलेल्या 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान यांना 'इंग्लिश मीडियम' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. त्याला लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचा मुलगा बबील इरफानचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचला. खास गोष्ट म्हणजे यावेळी बाबीलने आपल्या वडिलांचे कपडे परिधान केले होते. त्यानं ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसंच इरफान खानच्या आई आणि इरफानची पत्नी सुतापा सिकदार यांनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार का दिला हे देखील सांगितलं आहे.
बाबिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडीओ शेअर करत 'मम्मा माझी तयारी करत आहे. तर जयदीप अहलावत, राजकुमार राव आर. आणि आयुष्मान खुराना यांच्याकडून पुरस्कार घेताना, मी माझ्या भाषणात म्हणालो की, काहीही बोलण्याची माझी जागा नाही. लोक नेहमी म्हणतात की तु तुझ्या वडिलांच्या शूजमध्ये कधीच फिट बसू शकत नाहीस. पण कमीतकमी मी त्यांच्या कपड्यांमध्ये फिट बसू शकलो. मला प्रेम आणि आपुलकी दिल्याबद्दल ऑडियन्स आणि इंडस्ट्रीचे आभार व्यक्त करतो. मी असे म्हणू ईश्चितो की, मी तुम्हाला वचन देतो की, आपण सगळ्यांनी एकत्र हा प्रवास करू आणि भारतीय सिनेमाला उंचीवर नेवूयात.
इरफानला फॅशन शो, रॅम्प वॉक आवडत नव्हता
बाबीलने पुढे लिहिलं आहे, "कपड्यांमागची कहाणी अशी होती की, माझ्या वडिलांना फॅशन शो आणि रॅम्प वॉकमध्ये भाग घ्यायला आवडत नव्हता. परंतु कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी ते हे कपडे घालत असत. काल रात्री मी देखील असं केलं होतं. मी माझं स्थान नवीन तयार करण्याचा प्रयत्न करंत आहे, जिथे मी अस्वस्थ आहे. " व्हिडिओमध्ये सुतापा बाबिलची तयारी करत आहे. जेव्हा बाबेलने आईला विचारलं की, तु समारंभात का येत नाहीत तर सुतापा यांच उत्तर, "मी लोकांचा सामना करायला बिलकुल ईच्छुक नाही
आयुष्मान बाबिलला पहिल्यांदा भेटला
रविवारी आयुष्मान खुराना यांनी सोशल मीडियावर सांगितले की, इरफानचा मुलगा बबील याची पहिलीच भेट 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड दरम्यान झाली. फोटो शेअर करताना आयुष्मानने लिहिले की, ''हा फोटो वांद्रे मधील आहे, परंतु इरफान कुठेतरी शांततेत विश्रांती घेत असेल. त्यांचा दुहेरी विजय मी साजरा करत आहे. इरफानला, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार देण्याचा मला हा मान मिळाला. हा फिल्मफेअर अवॉर्ड मी बाबेलला दिला. पहिल्यांदा मी या सुंदर मुलाला भेटलो. मी माझ्या भविष्यात बबिलला चांगलं काम करताना पहावं अशी माझी इच्छा आहे. "