मुंबई : प्रेक्षकांना अजूनही कॉमिक टाइमसाठी दिवंगत अभिनेता कादर खानची आठवण येते. त्यांचे खोडकर डायलॉग लोकांना गुदगुल्या करण्यास भाग पाडतात. अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या कादर खानने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी त्यांना 1500 रुपये मिळाले. नंतर कादर खान यांनी 250 हून अधिक चित्रपटांसाठी डायलॉग लिहिले.
अभिनेता होण्यापूर्वी कादर खान प्राध्यापक होते
अभिनेता होण्यापूर्वी कादर खानची मुंबईतील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. बरेच दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी आपली ही नोकरी सोडली आणि त्यांनी त्यांना पूर्णपणे अभिनय आणि नाट्य क्षेत्रात झोकुन दिलं. कादर खान नाटक लिहायचे. 1972च्या 'जवानी दिवानी' या चित्रपटासाठी स्क्रिप्ट रायटर म्हणून त्यांना संधी मिळाली.
स्क्रिप्ट लिहिण्यासाठी 1500 रुपये मिळाले
जवानी दिवानी या चित्रपटामध्ये रणधीर कपूर, जया बच्चन, निरुपा रॉय आणि बलराज साहनी या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाची स्क्रिप्ट कादर खान आणि इंदरराज आनंद यांनी लिहिली होती. यासाठी कादर खान यांना 1500 रुपये फी मिळाली. जवानी दिवानी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. या सिनेमाने चांगली कमाई केली.
दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांनी दिली एंट्रीलेखनाबरोबरच कादर खानने 250 हून अधिक हिट सिनेमांत संवादही लिहिले. सर्वाधिक काम कादर खानने यांनी राजेश खन्नासोबत केलं. मात्र, कादर खानला अभिनयात आणण्याचे श्रेय दिलीपकुमार यांना जातं. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी, कादर खान 'कासार' या नाटकात काम करत होते. जे नाटक पाहून दिलीप कुमार प्रभावित झाले होते
सर्वात महागड्या कॉमेडियनचे बक्षीस
दिलीप कुमार यांनी कादर खानला ऑफिसमध्ये बोलावलं आणि 1974 मध्ये आलेला 'सगीना' आणि 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बैराग' या दोन चित्रपटांसाठी साइन केलं. चित्रपटाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांनी दिलेल्या दोन सिनेमांनंतर कादर खानने कधीच मागे वळून पाहिलं नाही. हिट अभिनेता झाल्यानंतर कादर खानला अभिनय आणि संवाद लिहिण्यासाठी भरमसाठ फि देण्यात येवू लागली. त्याला त्यांच्या काळातील सर्वात महागडा कॉमेडियनसुद्धा म्हणतात.
500 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय आणि डायलॉग
कादर खानने आपल्या अभिनय कारकीर्दीत 300 हून अधिक चित्रपट केले, तर त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांसाठी डायलॉग लिहिले. कादर खान यांना अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. 2018 मध्ये दीर्घ आजारानंतर कादर खानने या जगाला निरोप दिला. 2019 मध्ये, भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं.