लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...

Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही. 

ब्युरो | Updated: Feb 20, 2025, 11:48 AM IST
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात... title=
Ladki Bahin Yojana Two Lakh More Applications to be Rejected

Maharashtra Ladki Bahin Yojana Latest Update: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थीची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर चालू महिन्यातय आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण २ कोटी ११ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र चालू फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या सामनी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येत भर पडली आहे. या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास २ लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळं या फेब्रुवारीचा हफ्ता या महिलांच्या खात्यात येणार नसल्याचे समोर येत आहे.

लाडकी योजनेच्या ८३% लाभार्थी विवाहित महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे २.५ कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास ८३% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी ११.८% आहेत तर विधवांचा वाटा ४.७% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे १% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी ०.३%, सोडून दिलेल्या महिला ०.२% आणि निराधार महिला ०.१% आहेत.

३०-३९ वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी २९% होती. त्यानंतर २१-२९ वयोगटातील गट २५.५% होता तर ४०-४९ वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी २३.६% होता. खरंच, ७८% लाभार्थी २१-३९ वयोगटातील होते आणि २२% लाभार्थी ५०-६५ वयोगटातील होते. ६०-६५ वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ ५% होता. "६०-६५ वयोगटातील जवळजवळ ५% महिलांना लाभ मिळाला आहे.