'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला

Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'

दिक्षा पाटील | Updated: Aug 20, 2024, 04:42 PM IST
'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Kajol On Women Safty : रक्षाबंधनच्या निमित्तानं आपण सगळ्यांनीच आपल्या भावाला राखी बांधत हा सण साजरा केला. यानिमित्तानं सगळ्यांना आपल्या मुलांचे फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या सगळ्यात काहींनी कोलकातामध्ये डॉक्टर मर्डर केसशी संबंधीत काही पोस्ट देखील दिल्या. महिलांच्या सुरक्षेविषयी वाढती चिंता आणि मुलांच्या संगोपनात करण्यात येण्या सारखे बदल यावर अनेकांनी पोस्ट शेअर केल्या. यात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आहे. काजोलनं तिच्या पोस्टमधून सगळ्यांना एक संदेश दिला आहे. 

काजोलनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काजोलनं लेक नीसा आणि मुलगा युग आहे. हा फोटो शेअर करत काजोलनं कॅप्शन दिलं की रक्षा करणाऱ्या आज तुझा दिवस आहे. आज सगळ्या रक्षकांना समजलं की ही तिच गोष्ट आहे जी एका पुरुषाला घडवते... आपल्या आजु-बाजूला असलेल्या महिलांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटयला नको असं सुरक्षित वातावरण त्यांच्यावर आजुबाजूला तयार करायला हवं. चला आपल्या मुलांना आपण चांगलं घडवूया.. चांगली व्यक्ती होणं शिकवूया... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, काजोलनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, काजोल, मी प्रार्थना करतो की तू कायम आनंदी राहो आणि तुझी मुलं आनंदी राहोत. तुझे मुलं तुझ्यासाठी भाग्यशाली राहोत. दुसरा नेटकरी म्हणाला, तुमची खूप चांगली मुलं आहेत. काजोल, माझं तुझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद राहू देओ. तिसरा नेटकरी म्हणाला, मॅडम तुमचे खूप चांगले विचार आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, रक्षा कर कारण जगात खूप वाईट वृत्तीचे लोक आहेत. 

हेही वाचा : श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!

नीसा ही 21 वर्षांची आणि यूग हा 13 वर्षांचा आहे. काजोल आणि अजय हे 24 फेब्रुवारी 1999 रोजी पारंपारिक मराठी पद्धतीनं लग्न बंधनात अडकले. काजोल ही लोकप्रिय अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत चित्रपट दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची लेक आहे. अजयचे दिवंगत वडील वीरू देवगन एक लोकप्रिय अॅक्शन कोरिओग्राफर आहेत.