Kalki 2898 AD Part 2: काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि या चित्रपटाच्या पुढच्या भागाची उत्सुकता सुरुवातीपासूनच शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय कलाजगतामध्ये अशा काही कलाकृती पाहायला मिळाल्या आहेत, ज्यामध्ये विविधभाषी चित्रपटांमध्ये बाजी मारल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. इथूनच कलाजगत आणि कलाकारांचा इतर भाषांमधील चित्रपट वर्तुळामधील वावर वाढला आणि परिणामस्वरुप काही अफलातून कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.
अशाच चित्रपटांच्या गर्दीतलं एक नाव म्हणजे, Kalki 2898 AD. दि्ग्दर्शक नाग अश्विन यांच्या विज्ञान आणि काल्पनिक कथानकावर आधारित या चित्रपटानं प्रदर्शित झाल्या क्षणापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. (Kamal Hassan) कमल हासन, (Deepika Padukone) दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) आणि प्रभास यांच्यासह इतरही कलाकारांच्या दमदार भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला सध्या उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चासुद्धा आतापासूनच सुरु झाली आहे. Ami
खुद्द दिग्दर्शक नाग अश्विननंच चित्रपटाचा पुढील भाग नेमका कधी प्रदर्शित होईल, यासंदर्भातील माहिती दिली. आतापर्यंत या चित्रपटाचं 60 टक्के चित्रीकरण पूर्ण झालं असून, त्याचा पुढील भाग साधारण 2 ते 3 वर्षांनंतर प्रदर्शित होणार असल्याचं त्यानं प्रभाससोबतच्या Live गप्पांदरम्यान सांगितलं, या इन्स्टा लाईव्हमध्ये दीपिका मात्र कुठं दिसली नाही. असं असलं तरीही दीपिकाच्या बाळाच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी म्हणजेच 2027 च्या सुमारास Kalki 2898 AD चा पुढील भाग महाविक्रम करण्यासाठी सज्ज असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.
मागील काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या कल्कि 2898 एडी पार्ट 2 चित्रपटाची चर्चा आतापासूनच सुरु झाली असतानाच या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळणारं यशही लक्ष वेधत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं जगभरात कमाल कामगिरी करत जवळपास 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषकांच्या माहितीनुसार 'कल्की' आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा पाचवा तेलुगू चित्रपट ठरला आहे. तेव्हा आहा कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आणि पुढील काही वर्षांमध्ये येणारा चित्रपटाचा दुसरा भाग आणखी कोणते आणि किती विक्रम रचतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.