नशा सोडण्यासाठी कपिलला जाव लागल या हॉस्पीटलमध्ये

 कपिल कुठे फिरायला नाही तर रिहॅब सेंटरला स्वत:वर उपचारासाठी गेला आहे.

Updated: Apr 28, 2018, 04:03 PM IST
नशा सोडण्यासाठी कपिलला जाव लागल या हॉस्पीटलमध्ये  title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या आपल्या करियरच्या मोठ्या जडणघडणीतून जातोय. कपिल डिप्रेशनमधून जात असल्याच त्याच्या जवळचे सांगत आहेत. त्याला घेऊन अनेक चर्चा आणि अफवा पसरवल्या जात आहेत. एका आपत्तीजनक ट्विटनंतर कपिल शर्मा गायब आहे. कपिल सध्या आपली गर्लफ्रेंड गिन्नीसोबत फिरायला गेल्याचे कपिलचा प्रवक्ताने अमर उजालाला सांगितले. पण आता असेही वृत्त येतेय की कपिल कुठे फिरायला नाही तर रिहॅब सेंटरला स्वत:वर उपचारासाठी गेला आहे. गेल्या वर्षी कपिल शर्मा कोणत्याना कोणत्या वादात अडकला होता. कपिलचा मानसिक आजार, दारुच्या नशेत शिवीगाळ करण्याचे अनेक प्रकरण समोर आली होती. स्पॉटबॉय वेबसाइटचा संपादक विकी लालवानीसोबतही कपिलने दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याचा ऑडियो समोर आलाय. ज्यानंतर कपिलने विकी लालवाणी आणि आपली एक्स मॅनेजर आणि गर्लफ्रेंड निति आणि प्रितीवरही आरोप करत पोलीसात तक्रार केली होती.

नैराश्येच्या गर्तेत 

 

Finally #firangi in theatres now .and don’t forget to watch firangi musical night on #sony. Style by @rosepuri_styleblog

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकलेल्या कपिल शर्माला बाहेर पडायला वेळ देण्यात आला.

 

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

याकाळात कपिल टेलिव्हिजनपासून दूर गेला. काही दिवसांपूर्वी त्याने कॉमेडी शो सुरू केला. मात्र ट्विटरवर काही वादग्रस्त ट्विट लिहल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शिंदेने पोस्ट शेअर करून कपिल  शर्माला स्पेस आणि पुरेसा वेळ द्यावा अशी मीडियाकडे मागणी केली आहे.

कृष्णाने केला खुलासा 

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, कपिलचा 'फिरंगी' चित्रपट बॉक्सऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. त्यामुळे कपिलची मानसिक स्थिती बिघडली. 
कपिलबाबत लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे कृष्णाने समर्थन केलेले नाही.  त्याने कपिलच्या या चुकीला माफ करण्याचे आवाहन केले आहे. नैराश्याचा सामना करत असलेल्या व्यक्तीला मुद्दामून डिवचणे मूळीच योग्य नाही. कृष्णाने दिलेल्या माहितीनुसार कपिल अल्कोहलचं सेवन करतो.  त्याने ट्विट करणं बंद करायला हवे.