Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण

Hindu Rituals : देवाचा प्रसाद हा डाव्या हाताने घेतला तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो का? प्रसाद कायम उजव्या हातात का घ्यावा. काय आहे यामागील अध्यात्मक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

नेहा चौधरी | Updated: Jan 20, 2025, 02:27 PM IST
Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण  title=
Hindu Rituals in marathi

Why Prasad Should Take In Right Hand : हिंदू धर्मात पूजा आणि विधीसाठी अनेक नियम सांगण्यात आलंय. देवाच्या पूजेपासून नैवेद्याच ताट आणि प्रसाद कसा आणि कुठल्या हाताने घ्यावा अशा अनेक गोष्टींचे नियम सांगण्यात आलंय. आपण पाहिलंय प्रसाद कायम उजव्या हाताने घ्यावा असं ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगतात. जर कोणी डावा हात समोर केला तर लगचेच उजवा हात समोर कर मगच प्रसाद मिळेल असं म्हटलं जातं. तुम्ही कधी विचार केलाय काय, की डाव्या हाताने प्रसाद घेतला तर देव आपलं वाईट करेल. तर चला मग प्रसाद नेहमी उजव्या हाताने का घ्यावा यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं जाणून घेऊयात. (Why should prasad always be taken in the right hand Spirituality reason and science reason Hindu Rituals in marathi)

हिंदू शास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मात डाव्या हाताने प्रसाद घेणं अशुभ मानलं जातं. पण बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते. आपल्या शास्त्रांचं ज्ञान नसल्याने असं होतं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात उजव्या हाताने केल्याने सकारात्मक परिणाम होतो अशी शास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे धार्मिक कार्य करताना, यज्ञ, दान इत्यादी गोष्टी करताना उजव्या हातानेच करावात असं शास्त्रात सांगण्यात आलंय. हवन करताना आणि यज्ञ नारायण भगवंताला आहुती देताना उजव्या हाताचाच वापर करण्यात येतो. उजवा हात सकारात्मक उर्जेचं प्रतीक मानलं गेलंय. 

हिंदू परंपरेनुसार प्रसाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद मानला जातो. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी ही प्रथा रुढ केलीय. शिवाय डाव्या हाताचा वापर शारीरिक शुचितेसाठी करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठीही डाव्या हाताचा वापर न करणे चांगले समजलं जातं.

वैज्ञानिक कारण जाणून घ्या!

पण खरं सांगायचं तर, डावं-उजवं करणं हे विज्ञान आणि श्रद्धेचं कॉम्बिनेशन आहे. विज्ञानानुसार उजवा हात सिम्पथेटिक नर्वंस सिस्टिमशी जोडला असतो. आपलं उजवं अंग मेंदुच्या डाव्या भागामुळे चालत आणि हा भाग उत्साह controller असतो. प्रसाद घेताना आनंद आणि उत्साह हवाच ना. 

तसंच हिंदू शास्त्रात उजव्या हाताला फार महत्त्व आहे. कारण याच्या वापराने क्रिया - शक्ती जागृत होते. जी देवाच्या संपूर्ण आशिर्वादाला समावून घेते. पण आपल्या धर्मात उजवा हात देण्याचा किंवा दानाचे प्रतिक आहे. तर डावा हात स्विकारण्याचे प्रतिक आहे. डावा हात हा मात्र एक confusion creator च आहे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)