Karwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड

Karwa Chauth 2022: गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही

Updated: Oct 13, 2022, 07:53 AM IST
Karwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड  title=
Karwa Chauth 2022 Bollywood Actress ratna pathak shah on not following the tradition

Karwa Chauth 2022: कार्तिक महिन्याच्या चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं आहे. या दिवशी उत्तर भारतामध्ये विवाहित महिलांसाठी एका विशेष पर्वाचा दिवस उजाडतो. हा दिवस म्हणजे करवा चौथचा (Karwa Chauth ). निर्जल उपवास करत या दिवशी विवाहिती महिला शंकर- पार्वतीची आराधना करतात. रात्रीच्या वेळी चंद्रदर्शनानंकर महिला त्यांचा हा पाणी पिऊन सोडतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याचीच साथ जन्मोजन्मी मिळण्यासाठी म्हणून हा उपवास केला जातो अशी धारणा आहे. यंदाच्या वर्षी नव्यानं लग्न झालेल्या सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या पतीसाठी करवा चौथची पूजा (Karwa Chauth puja) मांडणार आहेत. काही अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून ही परंपरा जपतही आल्या आहेत. पण, एक लोकप्रिय चेहरा मात्र याला अपवाद ठरत आहे. अभिनय क्षेत्रात सातत्यानं चौकटीबाहेरच्या भूमिका मोठ्या ताकदीनं साकारणारा हा चेहरा आहे अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचा. (Karwa Chauth 2022 Bollywood Actress ratna pathak shah on not following the tradition )

अष्टपैलू अभिनेते नसिरुद्दीन शाह (naseeruddin shah) यांच्यासोबत रत्ना पाठक यांनी लग्नगाठ बांधली आणि गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही. 

लग्न करण्यापासून ते अगदी एकमेकांचा या नात्यात स्वीकार करण्यापर्यंत नसिर आणि रत्ना या दोघांनीही कायमच आपलं वेगळेपण जपलं आहे. त्यांच्या या नात्याला कोणत्याही परंपरेची, समजुतीची किनार नाही. हे खुद्द रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) यांनीच केलेल्या एका वक्तव्यातून स्पष्ट झालं होतं. 

अधिक वाचा : Horoscope 13 october 2022 : आज सिंह, कन्या राशीच्या व्यक्तींनी सावध राहा; एकदा कारण वाचून घ्याच 

 

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी करवा चौथविषयी आपली बाजू स्पष्ट केली होती, जे ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महिलांच्या परिस्थितीत अद्यापही फारसा बदल झालेला नाही, असं सांगताना काही लहानसहान भाग मात्र याला अपवाद आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं. आपला समाज सध्या प्रचंड रुढीवादी होत असल्याचं सांगत आपण अंधश्रद्धेकडे झुकत असल्यावर त्यांनी कटाक्ष टाकला. 

'धर्म, (Religion) हाच आयुष्याचा अविभाज्य घटक आहे याचा स्वीकार करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे . मला एकदा कुणीतरी विरारलेलं की तुम्ही करवा चौथचा उपवास करताय का?, ज्यावर उत्तर देत मी म्हटलेलं, वेड लागलंय का मला... असं काहीतरी करायला', अशा काहीशा बोचऱ्या तरीही स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Modern women doing Karwa Chauth appalling: Ratna Pathak worries India is  turning into Saudi | People News | Zee News

आयुष्याला काहीतरी Validity हवीये म्हणून या शिकलेल्या, मॉडर्न महिला पतीच्या आयुष्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवत आहेत. भारतात विधवा असणं म्हणजे भयावह परिस्थितीचा सामना करणं, आज 21 व्या शतकात आपण हे सर्व बोलतोय; या शिकल्यासवरलेल्या महिला असं करताहेत असं म्हणत रत्ना पाठक शाह यांनी आपले विचार मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांच्याच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. पण, समाजाला चांगलं काय वाटतं याकडे नेहमीप्रमाणेच रत्ना पाठक शाह यांनी दुर्लक्ष करत आपल्या सिद्धांतांना केंद्रस्थानी ठेवलं.