मुंबई : जेव्हा-जेव्हा बॉलिवूडमध्ये रिलेशनशिपचा विचार येतो तेव्हा रणबीर कपूरच्या रिलेशनशिपची चर्चा नक्कीच होते. रणबीरचे संबंध बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत होते. आधी दीपिका पदुकोण आणि नंतर कतरिना कैफ.
ब्रेकअपनंतरही रणबीर कपूरने या दोघांसोबत चित्रपट केले आहेत. कतरिना आणि रणबीरमध्ये कधीच काही फारसं चांगलं नव्हतं. याची साक्ष हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला येईल. ज्यामध्ये कतरिना सगळ्यांसमोर रणबीर कपूरला फटकारते. आणि म्हणते- 'पिऊन आलास का?'
रणबीर कतरिनाला बोलू देत नव्हता
2017 मध्ये, जेव्हा 'जग्गा जासूस' चित्रपटाचं एक गाणं लॉन्च होणार होतं, तेव्हा एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत रणबीर तेथे पोहोचला होता. या कार्यक्रमात कतरिनाला रणबीरसोबत पुन्हा एकदा काम करताना कसं वाटलं, असा प्रश्न विचारण्यात आला. पण कतरिनाला प्रत्युत्तर देण्याऐवजी रणबीरने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला की, ती मला नेहमी सांगते की, मी तुला 'अजब प्रेम की गज़ब कहानी' आणि 'राजनीती' हे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
आता आम्ही 'जग्गा जासूस' मध्येही एकत्र काम केलं आहे. ज्याबद्दल कतरिनाने मला अनेकदा सांगितलं आहे की, हा चित्रपट नक्कीच हिट होईल कारण या चित्रपटात मी तुझ्यासोबत काम करत आहे. आम्ही मजेत म्हणायचो की, आमच्या चित्रपटाला तुझा स्पर्श झाला तरी चित्रपट सुपरहिट होईल.
कतरिनाला आला राग
या कार्यक्रमात रणबीर कपूरला त्याच्या डान्सिंग स्किल्सबद्दल विचारलं असता त्याने उत्तर दिलं की, हे माझ्यासाठी थोडं कठीण आहे. कारण मी कतरिना इतकी सुपर डान्सर नाहीये. मला वाटतं की हे अद्भुत आहे. ती ज्या पद्धतीने डान्स करते. फार कमी लोकांना माहीत आहे की, जेव्हा कतरिनाने 'शीला की जवानी', 'चिकनी चमेली' आणि अशी अनेक धमाकेदार गाणी केली, तेव्हा त्या सगळ्या यशामागे मीच होतो
कारण मी कतरिनाची रिहर्सल घ्यायचो. तिच्या एक्सप्रेशन आणि इतर गोष्टींवरही मीच काम केलं. मी तिला सगळं काही शिकवलं. हे ऐकून कतरिनाला राग येतो आणि ती म्हणते- 'तु पिऊन आलायेस का?' या दोघांचा हा व्हिडिओ जरी जुना असला तरी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.