Keerthy Suresh : कीर्ति सुरेश गेल्या अनेक दिवसांपासून वरुण धवन आणि वामिका गब्बीसोबतच्या तिच्या बेबी जॉन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून कीर्ति ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एका व्हिडीओत कीर्ति ही पापाराझींवर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे पापाराझींनी तिच्या नावाचा चुकीचा उच्चार केला आणि तिला डोसा देखील म्हणाले. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
पापाराझी कीर्तिला क्रिती म्हणून हाक मारत होते. त्यामुळे कीर्ति ही चिडली. त्यानंतर तिनं त्यांना सांगितलं की तिचं नाव क्रिती नाही कीर्ति आहे. त्यानंतर लगेच काही लोकं डोसा बोलू लागले. कारण तिचा डोसाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर कीर्तिनं यावर देखील उत्तर दिलं आहे. पण यावेळी कीर्तिनं हसत उत्तर दिलं की कीर्ति डोसा नाही, कीर्ति सुरेश आहे. तर डोसा मला खूप आवडतो. त्यानंतर हसत कीर्तिनं कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
'बेबी जॉन' हा चित्रपट थलपती विजय आणि अॅटलीच्या थेरी या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटानं त्याच्या ओपनिंग डेवर बॉक्स ऑफिसवर फक्त 13 कोटींची कमाई केली होती.
कीर्ति सुरेशनं यावेळी एक डेनिम मिडी ड्रेस परिधान केला होता. त्याला कॉलर नेकलाइन, बटन क्लोजर, कमरेवर टाईमअप डिटेलिंग आणि एक फिट-अॅन्ड-फ्लेयर होता. तिचा मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि त्यासोबत सुंदर मंगळसूत्रानं तिचा लूक खुलून दिसला होता. कीर्तिनं जाताना फोटोग्राफर्सला 'धन्यवाद' म्हटलं.
हेही वाचा : वाढदिवस सलमानचा पार्टी अंबानींनी दिली! जामनगरमधील सेलिब्रेशनचा Video एकदा पाहाच; दिवाळीप्रमाणे...
दरम्यान, बेबी जॉन' या चित्रपटाचं दिग्दर्शन कैलीस यांनी केलं आहे. तर निर्माता म्हणून अॅटलीचा हा पहिला चित्रपट आहे. कीर्तिनं 12 डिसेंबर रोजी गोव्यात तिचा बालपणीचा मित्र आणि बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असलेला बॉयफ्रेंड अॅन्थनी थैटिलसोबत लग्न केलं. कीर्तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्या दोघांच्या लग्नात तृषा कृष्णन, थलपित विजय, ऐश्वर्या लक्ष्मी आणि अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.