मुंबई : अभिनेता संजय दत्त यानं हल्लीच एका मुलाखतीमध्ये त्याच्या संघर्षाच्या दिवसांविष. वक्तव्य केलं. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आपली काय अवस्था होती, हेसुद्धा त्यानं सांगितलं. जीवनात एक टप्पा असा होता, जेव्हा त्याला काही अशा वाईट सवयी लागल्या जेव्हा त्याला सुधारगृहातही जावं लागलं होतं. विचारही करणं अशक्य होतंय ना? (Sanjay Dutt)
संजूबाबानं सांगितल्यानुसार ज्यावेळी तो सुधारगृहातून परतला तेव्हा अनेकजण, विशेष म्हणजे महिला त्याला ‘चरसी’ म्हणून हिणावत होत्या.
महिलांसमोर Cool दिसण्यासाठी म्हणून मी ड्रग्ज घेऊ लागलो होतो, असं तो म्हणाला. ‘मी फार लाजरा होतो. विशेष म्हणजे मुलींसमोर. यासाठी मग मी कूल दिसण्यासाठी खटाटोप करत होतो. तुम्ही ड्रग्ज घेता आणि एकाएकी महिलांसमोर कूल होता...
मी आयुष्यातली 10 वर्षे एकतर बाथरुमममध्ये किंवा मग माझ्या खोलीमध्ये घालवली आहेत. मला चित्रीकरणामध्ये अजिबातच रस नव्हता. पण, आयुष्य हे असंच होतं एकाएकी सर्वच बदललं’, असं तो म्हणाला.
सुधारगृहातून येऊनही लोक आपल्याला ‘चरसी’ म्हणून हिणवत असल्याचं पाहून हे आपल्याला अजिबातच आवडत नव्हतं, असंही त्यानं सांगितलं. पुढे परिस्थिती पाहून त्यानं स्वत:वर काम करण्यास सुरुवात केली.
संजूबाबानं व्यायाम सुरु केला. ज्यानंतर व्यसनाधीन व्यक्तीपासून तो एका रुबाबदार व्यक्तीपर्यंत पोहोचला. त्याच्याकडे पाहून लोक प्रशंसाही करु लागले. हा इकता मोठा बदल चिकाटी आणि जिद्दीशिवाय शक्यच नव्हता... नाही का ?