मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या चर्चेत असते. ती तिच्या आगामी 'जुग जुग जीयो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कियारासोबत वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कियाराच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात लग्नानंतरच्या नात्यातील समस्या दाखवण्यात आल्या आहेत. कियाराने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं होतं की, तिला कसा जोडीदार हवा आहे.
दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने सांगितलं आहे की, तिला तिच्या जोडीदारामध्ये कोणती खासियत हवी आहे. तिला वाटते की विश्वास, समजूतदारपणा, निष्ठा, आदर आणि विनोदाची भावना तिला तिच्या जोडीदारामध्ये हव्या आहेत. कियारा म्हणाली- मला अशी व्यक्ती हवी आहे जी माझ्यावर प्रेम करेल आणि मला टार्गेट करणार नाही.
रिलेशनशिपला घेवून दिली ही एडवाइज
कियारा अडवाणीने चाहत्यांना हेल्थी नात्याचा सल्ला दिला. ती म्हणाली की, प्रत्येक नात्यासाठी कम्यूनिकेश खूप महत्त्वाचं असतं. मला वाटतं की कोणत्याही नातेसंबंधातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या ईगोला पुढे येऊ देता. माझ्यासाठी एक हेल्दी रिलेशनशिप हे आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल बोलता. एकमेकांना जसे आहेत तसं स्वीकारता.