Koffee With Karan 8 Gift Hamper : लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा चॅट शो चर्चेत असणार आहे. यावर येणाऱ्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात. मात्र, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी कोणती गोष्ट असते ती म्हणजे या सेलिब्रिटींना मिळाणारं गिफ्ट हॅम्पर. प्रत्येक एपिसोडमध्ये होणाऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये जी व्यक्ती जिंकते. त्याला एक खूप सुंदर असं गिफ्ट हॅम्पर मिळतं. अशात हे त्यात काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना. त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी असताता ते आता अखेर समोर आलं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'कॉफी विथ करण' च्या 8 व्या सीझनमध्ये गिफ्ट हॅम्परला करण जोहरची आई हीरू जोहर यांची मैत्रिण दिप्ती गोयनका यांनी तयार केलं आहे. सगळ्यात आधी करणनं त्यात असणारी त्याचा दागिण्याचा ब्रँडचं असलेलं एक गिफ्ट दाखवलं. त्याच सोन्याचा हार होता. हा हार 22 कॅरेट गोल्ड पासून बनवण्यात आल्याचं म्हटलं जातं. तर या हारची किंमत जवळपास 1 रुपये असल्याचे म्हटलं जातं. या एमराल्ड सेटशिवाय करणनं या हॅम्परमध्ये असलेल्या आणखी अनेक गोष्टी दाखवल्या. यात गो प्रो 11 वॉटरप्रुफ कॅमेरा आहे. ज्याची किंमत 30-35 हजार आहे.
Get ready for the season finale extravaganza! Join us as #KoffeeWithKaran Season 8 wraps up with a bang, featuring the coveted Koffee hamper.#HotstarSpecials #KoffeeWithKaran Season 8 - all episodes now streaming on Disney+ Hotstar! #KWKS8OnHotstar https://t.co/N4jGeW9Pjs
— Apoorva Mehta (@apoorvamehta18) January 25, 2024
त्या व्हिडीओत करण जोहर पुढे बोलतो की त्याच्या शोमध्ये ए-लिस्टर पाहुणे येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट असायला हवं. त्यासाठीच स्पेशल असं Sonos चा वायरलेस स्पीकर आहे. या स्पीकरला ते सोबत कुठेही घेऊन जाऊ शकतात. त्याशिवाय त्यांच्या पार्टीत ते धम्माल करू शकतात. त्याची किंमत 30 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्यासोबत गूगल पिक्सल 8 प्रो मोबाईल कॅमेरा देखील आहे. या फोनची मार्केट प्राइज ही 95 हजार रुपये असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'
याशिवाय त्या गिफ्ट हॅम्परमध्ये अनेस सेल्फ केअरच्या वस्तू आहेत. त्यात बॉडी मसाजर आहे. या मसाजरची किंमत 60 हजार रुपये आहे. परफ्यूम आहे ज्याची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे. त्याशिवाय बॉडी ऑइल, चीज नाइफचा सेट, चॉकलेट, हनी, कॉफी मग आणि स्वीट्स त्याशिवाय बेकरीतील काही गोष्टी. या सगळ्या गोष्टी मोठ्या कंपन्याच्या असून त्या सगळ्या महागड्या आहेत.
यंदाच्या सीझनमध्ये शर्मिला टागोर, सैफ अली खान, जीनत अमान, नीतू कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, पादुकोण-रणवीर सिंह, अजय देवगण, रोहित शेट्टी, कियारा अडवानी, विकी कौशल पासून अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.