Smita Patil Birth Anniversary: बऱ्याचदा कामच अमुक एका व्यक्तीची ओळख बनतं. अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil Birthday) यांच्या बाबतीत हेच अगदी खरं ठरलं. हिंदी कलाजगतातील अद्वितीय अभिनय कौशल्य असणाऱ्यांच्या यादीत (Smita Patil) स्मिता पाटील यांचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. फार कमी वयातच जग सोडून गेलेल्या या अभिनेत्रीचे चित्रपट आजही नवोदितांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. हिंदी आणि मराठी कलाजगतावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीच्या जन्मदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. (late actress Smita Patil Birthday her last wish will make you cry )
स्मिता पाटील, नाव घेताच डोळ्यांसमोर एक असा चेहरा उभा राहतो जो तुम्हाला तुमच्याआमच्यातलाच वाटतो. जीवनाचा प्रवास लहान असला तरीही स्मिता यांनी त्यातही असंख्य आठवणी प्रेक्षकांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिला. पण, नियतीनं मात्र स्मिता पाटील यांच्यासोबत जी वेळ आणली ते पाहून कित्येकांच्याच डोळ्यात पाणी आलं.
'ती' ठरली स्मिता पाटील यांची अखेरची इच्छा...
स्मिता पाटील अभिनेता राज कुमार यांच्यासोबत ‘गलियों का बादशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होत्या. एके दिवशी जेव्हा त्या या अभिनेत्याला भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, की तिथं त्यांचा मेकअप सुरु होता. (Smita Patil last wish)
दीपक सावंत हे मेकअप आर्टिस्ट तिथं स्मिता पाटील यांच्याही मेकअपची जबाबदारी सांभाळत होते. बस्स, तेव्हाच त्यांनी आपणही त्यांच्याकडून असाच निवांत झोपून मेकअप करुन घेऊ अशी इच्छा व्यक्त केली. राज कुमार यांना पाहून तुम्ही असं काही ठरवू नका, असा सल्ला खुद्द सावंत यांनीच पाटील यांना दिला. तुम्ही बसूनच मेकअप करुन घ्या कारण, तेव्हाच तो व्यवस्थित करता येतो असं सांगताना राजकुमार यांची बात काही औरच असल्याचंही ते म्हणाले.
दीपक यांचं स्मिता पाटील यांनी ऐकलं. पण, पुढे होत्याचं नव्हतं झालं. 1986 मध्ये या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती अखेर त्यांच्या निधनानंतर पूर्ण झाली. अभिनेत्रीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांच्या आधी खुद्द सावंत यांनीच स्मिता पाटील यांना मेकअप करत थरथरत्या हातानं त्यांना एखाद्या नववधुप्रमाणं सजवलं होतं. स्मिता पाटील यांचं ते रुप आजही अनेकांच्या नजरेत कायम आहे.