महात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

आपल्या सगळ्यांचा इतिहास ठरलेल्या महात्मा गांधींनी कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Nov 15, 2024, 06:58 PM IST
महात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Mahatma Gandhi College Marks in History : महात्मा गांधी यांचा आपल्या स्वातंत्र्यात किती मोलाचा वाटा होता हे कोणालाही सांगायची गरज नाही. त्यांच्या संबंधीत अनेक गोष्टींची चर्चा ही आजही वेगवेगळ्या देशांमध्ये सुरु असते. भारत म्हटलं की परदेशी लोकांच्या डोक्यात आणि तोंडात जर सगळ्यात आधी काही येत असेल तर ते महात्मा गांधी यांचं नाव. पण तुम्हाला माहितीये का की महात्मा गांधी हे कोणत्या कॉलेजमध्ये शिकले होते आणि त्यांना किती मार्क मिळाले होते. त्यांची गुणपत्रिका ही दिल्लीच्या राजघाट येथे असलेल्या म्यूजियममध्ये ठेवण्यात आली आहे. चला तर त्यांचे फोटो पाहूया...

महात्मा गांधी यांच्या कॉलेजची मार्कशीट ही राजघाट म्यजियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. ही त्यांची मार्कशीट आहे. गुजरातच्या भावनगर येथे असलेल्या सामल दास कॉलेजची आहे. या म्यूजियममध्ये देश-विदेशच्या लोक हे गांधीजीं संबंधीत गोष्टी पाहण्यासाठी पोहोचतात. या मार्कशीटमध्ये महात्मा गांधींना इंग्रजीमध्ये 89, सेकंड लॅन्गवेजमध्ये 45, गणितात 59, इतिहासात फक्त 20 मार्क आणि विज्ञानात 34 मार्क होते. विज्ञान आणि इतिहासला मिळून त्यांना फक्त 54 मार्क दिसत आहेत. 

Mahatma Gandhi result from college know his marks in history and all the subject

या मार्कशीटमध्ये असलेल्या सगळ्या मुलांचीं ग्रॅंड टोटल ही 300 मार्कां पेक्षा जास्त असल्याचं दिसून येत आहे. तर महात्मा गांधी यांची सगळ्या विषयांची एकूण मार्क हे 247 आहेत. इथे दिसऱ्या सगळ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांच्या मार्कांना इतकं महत्त्व न देता त्यांच्या प्रतिभेला जास्त महत्त्व देण्यासाठी प्रेरित करतात. 

हेही वाचा : Winter Bike Tips: हिवाळ्यात बाईकची घ्या अशी काळजी; मिळेल जबरदस्त मायलेज

इतकं सगळं असलं तरी महात्मा गांधी यांना त्यांच्या मार्कांवरून नाही तर त्यांनी स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला त्यासाठी ओळखतात. तर या फोटोमध्ये गांधी जी यांचं हस्ताक्षर दिसून येतं. या म्युजियमध्ये आजही ती जीप ठेवली आहे ज्यातून महात्मा गांधी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.