मलायका अरोरा पँन्ट न घालताच पडली घराबाहेर; व्हिडीओ व्हायरल होताच होऊ लागली ट्रोल

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: May 30, 2022, 05:02 PM IST
मलायका अरोरा पँन्ट न घालताच पडली घराबाहेर; व्हिडीओ व्हायरल होताच होऊ लागली ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. याचं कारण म्हणजे ती अलीकडेच आपल्या मुलासोबत अशा कपड्यांमध्ये दिसली की, लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रेंडी होण्यासाठी मलायका अनेकदा तिच्या फॅशन सेन्सवर नवनवीन प्रयोग करत असते. 

मलायका पँटशिवाय पोहोचली
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, अमृता अरोराने पांढर्‍या रंगाची कोट-पँट घातली होती आणि तिच्या फॉर्मल लूकला कॅज्युअल टच देत होती. तिने पांढरे स्नीकर्स घातले होते आणि काळ्या शेड्ससह तिचा लूक पूर्ण केला होता. तर मलायकाचा मुलगा अरहान काळ्या टी-शर्ट आणि हिरव्या जॉगर्समध्ये दिसला. पण मलायका अरोरारा व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाइज स्ट्रीप शर्ट घातला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकांनी  केलं ट्रोल
मलायकाचा हा व्हिडीओ समोर येताच लोकं तिच्या पॅंटबद्दल विचारू लागले. एका यूजरने लिहिलं, 'तुम्ही तुमची पँन्ट विसरलात का?' तर दुसऱ्याने लिहिलं, 'हे लोकं फक्त शर्टच घालतात आणि कुठेही जातात'. त्याचबरोबर दुसऱ्या एका युजर्सने लिहीलं 'हिला पहिली पँन्ट घालायला द्या रे बाबा' असं लिहिलं. मलायका अरोरा दररोज ट्रोल होत असते. पण या ट्रोल्सचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. तिला कूल राहून तिच्या लूकमध्ये नवं-नवीन प्रयोग करायला आवडतात.