Spruha Joshi: सेलिब्रेटी हे किती फूडी असतात तेही आपण सोशल मीडियावर पाहत असतो. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या खवय्येगिरीची. अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनयासोबत तिच्या कविताही प्रचंड लोकप्रिय ठरतात. नुकतीच ती 'झी मराठी'वरील 'लोकमान्य' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित मालिकेतून दिसली होती. तिनं लोकमान्य टिळकांच्या पत्नीची भुमिका केली होती. तिच्या या भुमिकेसाठीही तिचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. स्पृहा ही आपल्याला अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांतून दिसली आहे. सोबतच तिनं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले होते. स्पृहा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलली आहे. यावेळी तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला समोरे जावे लागले आहे.
सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती खेकडा कसा खावा? याचं ट्रेनिंग देताना दिसत असून त्यातही ती खेकडा खाते आहे. यावेळी हा व्हिडीओ फारच गमतीत आणि फूड प्रेमी म्हणून घेतल्याचा वाटतो आहे परंतु नेटकऱ्यांनी मात्र याचे वेगळेच टोक गाठले आहे. तिला यावेळी तिच्या आडनावावरून ट्रोल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अनेकदा नॉनव्हेज खवय्यांसाठी तयार केलेले व्हिडीओ हे प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा व्हिडीओंची ही सतत चर्चा रंगलेली दिसते. त्यातून मासे, खेकडे, पापलेट, बोंबील, इतर माशांचे प्रकार यांवरील फूड ब्लॉगरनं केलेले व्हिडीओ हे चांगलेच रिलेट होतात. त्यातून माशांसाठी बनवली गेलेली ग्रेव्ही, मसाले यांची रेसिपीही प्रत्येक गृहिणी फॉलो करतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा व्हिडीओंची चांगलीच चर्चा रंगलेली असते.
हेही वाचा : रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?
'ओसावा' आणि विनोद गायकर यांनी हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात स्पृहा आणि विनोद हे मस्तपैंकी खेकडा खाणं एन्जॉय करत आहेत. परंतु नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. काही नेटकरी म्हणतात. 'जोशींची ना तु??' तर दुसऱ्या एकानं कमेंट केलीये की, 'जोशी ना तू, अगं देवाला तरी घाबरं' काहींनी कमेंट केलीये की, 'स्पृहा जी खरंच फार सुंदर स्वाध्याय केला, ज्यांना खेकडा खाता येत नाही ते आता नक्की खेकडा खाणारा', 'खरंतर ज्यांना जे योग्य वाटेल ते त्याने खावं, म्हणजे veg or nonveg असं. पण मग एरवी जातीचा तोरा मिरवू नये', 'मच्छी महाग, कारण ही लोकं' अशा काहींनी कमेंट्स केल्या आहेत. तर एकानं लिहिलंय की, ''लाजा कशा वाटत नाहीत ब्राम्हण ना तू खेकडे खातेय निर्लज्ज, काय त्या कविता करते, सूत्रसंचालन काय उपयोग त्याचा, असला बालिशपणा करतेस त्यावर काय उपयोग', 'पापा केहेते है बडा नाम करेगी, खेकडा खाके बडा काम करेगी', अशी एकानं कमेंट केली आहे.
तर दुसरीकडे, 'आईला स्पृहा तू खेकडा इतका मस्त खातेस. वाटलं नव्हतं ग कधीच. आजकाल joshi-gokhle-paranjpe आम्हाला गाईड करू लागलेत. brahmanatva संपुष्टात आलय', तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, 'नको लोड घेऊ. आम्हाला माहिती आहे तुला अपराधी भावना वाटते. खा तु. पण मोठेपणा सांगू नको ब्राह्मण आहे म्हणून'.