दिग्दर्शक विजय केंकरेंना कोरोनाची लागण

प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Aug 6, 2020, 09:36 PM IST
दिग्दर्शक विजय केंकरेंना कोरोनाची लागण title=

मुंबई : प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विजय केंकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या सहा ते सात दिवसांपासून त्यांना ताप येत होता, त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरीच क्वारंटाईन करून घेतलं होतं. पण संध्याकाळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

विजय केंकरे यांनी दिग्दर्शनासोबतच अभिनयही केला आहे. मागच्या २ वर्षांमध्ये विजय केंकरे यांनी परफेक्ट मर्डर, महारथी, सर्किट हाऊस ही नाटकं दिग्दर्शित केली. तसंच मुंबई-पुणे-मुंबई ३ या चित्रपटातही विजय केंकरे यांनी भूमिका केली. 

दरम्यान मागच्याच आठवड्यात विजय केंकरे यांच्या आई आणि दिग्गज अभिनेत्री ललिता केंकरे यांचं निधन झालं होतं. २८ जुलैला पहाटे झोपेतच ललिता केंकरे यांचा मृत्यू झाला होता. विजय केंकरे हे दिग्दर्शक दामू केंकरे यांचे पूत्र आहेत.