TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली 14 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. परंतु या मालिकेत सध्या कलाकार आणि निर्मात्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसते आहे. या मालिकेतील अभिनेत्री या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा (TMKOC Controversy) आरोप करताना दिसत आहेत. त्यामुळे या मालिकेतील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मालिकेतील लोकप्रिय कलाकारही ही मालिका सोडून गेले होते. या मालिकेतील मुख्य भुमिकेत असणाऱ्या दयाबेनही अनेक वर्षांपासून मालिकेतून गायब आहेत. त्यातून मालिकेतील टप्पूही ही मालिका सोडून गेला आहे.
त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता अफाट असली तरी मात्र या मालिकेभोवती वादांची मालिका ही सुरू झाली आहे. त्यातून आता या मालिकेतील बबिताजी (Babitaji From TMKOC) हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता यांच्यासोबतही निर्मात्यांकडून ट्रोर्चर झाल्याचे गंभीर आरोप या मालिकेतील अभिनेत्री मोनिका भदौरिया (Monika Bhadoriya) यांनी केले आहेत. काही दिवसांपुर्वी या मालिकेत बावरीची भुमिका करणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिनं या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर लैगिंक छळाचे आरोप केले होते. आता यावेळी मोनिका यांनी सांगितले की, बबिताजीची भुमिका करणाऱ्या मुनमुन दत्ताही (Munmun Dutta) हा शो करत असल्या तरी त्यांनाही असित मोदीनं खूप टॉर्चर केले आहे.
न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत मोनिका यांनी सांगितले की, ''मुनमुन यांनी शो सोडला नाही परंतु सेटवर त्यांचाही छळ झाला आहे. त्यासाठीच त्या बऱ्याच काळासाठी शूटिंगला येत नव्हत्या. असित मोदी सेटवर सगळ्यांनाच फार त्रास देतो आणि त्यामुळे लोकं शो सोडून जात आहेत. त्यानंतर त्यांना परत बोलावले जाते. मुनमुनसुद्धा खूप वेळा शो सोडून गेली आहे. परंतु त्यांना परत बोलावले जायचे.''
हेही वाचा - उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' जूना फोटो पाहून राज ठाकरे म्हणाले, ''खूप छान दिवस होते...''
काही दिवसांपुर्वी मोनिका भदौरिया यांनी स्वत:हून शो सोडला होता आणि असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2019 त्यांनी हा शो सोडला होता. या वर्षी त्यांना 3 महिन्यांचे पैसेही मिळाले नव्हते. मोनिका यांच्या आईचे निधन झाले होते तेव्हा त्यांना आठवड्यातचं सेटवर बोलवण्यात आले होते. त्यातून त्यांना असंही सांगण्यात आले होते की, तुला आम्ही पैसे देतो तेव्हा आम्ही तुला कधीही बोलवून घेऊ शकतो. सोबतच अभिनेत्री प्रिया अहूजा यांनीही निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांना 9 महिने शोमध्ये बोलवले नव्हते. निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. त्यांच्यावर पेैसे थकवल्याबद्दलही आरोप करण्यात आले आहेत.