मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज केस प्रकरणी ताब्यात घेण्याऱ्या एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मागे एनसीबीच्या चौकशीचा फेरा लागला. आर्यनवर कारवाई करण्याऱ्या एनसीबी पथकातून पुढे आलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचीही सध्या बरीच चर्चा सुरु आहे. हे अधिकारी आहेत समीर वानखेडे. (Shah rukh khan, Aryan khan, sameer wankhede)
एनसीबीचे झोनल डिरेक्टर म्हणून ओळख असणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावरही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवाय त्यांचं खासगी आयुष्यही विविध कारणांनी चर्चेत आलं आहे.
विविध मार्गांनी फाटे फुटणाऱ्या या चर्चांमध्ये एक विषय अधिक गाजतोय, तो विषय म्हणजे दहा वर्षांपूर्वी समीर वानखेडे आणि शाहरुखचा झालेला आमना-सामना.
शाहरुखवर यापूर्वीही वानखेडेंनी केलीये कारवाई
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार जवळपास 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्य़े समीर वानखेडे यांनी शाहरुख खानवर कारवाई केली होती.
शाहरुख त्याच्या कुटुंबासमवेत लंडन आणि हॉलंड येथे सुट्टी व्यतीत करुन आला होता. त्यावेळी वानखेडे कस्टम विभागात कार्यरत होते. त्यांनी विमानळावर शाहरुखला रोखलं. त्यांनी असं करण्यामागे एक कारणंही होतं.
हे कारण म्हणजे, शाहरुखनं त्याच्यासोबत आणलेल्या 20 बॅगा. शाहरुखची या प्रकरणी चौकशीही करण्यात आली होती.
इतकंच नव्हे, तर प्रमाणापेक्षा अधिक सामान सोबत आणल्यामुळे त्याला दंडही ठोठावण्यात आला होता. किंग खाननं दंड स्वरुपात दीड लाख रुपये इतकी रक्कम भरली होती.
या प्रकरणानंतर 10 वर्षांनी समीर वानखेडे यांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत शाहरुखचा मुलगा आर्यन खान अडकला असून त्याच्या अडचणी मात्र संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत.