मुंबई : सासू-सुनेचं नात्यात अनेक चढ उतार असतात. आपण अनेक ठिकाणी पाहतो ऐकतो सासू सुनेचं कधीचं पटत नाही. तेव्हा अनेक महिलांना वाटत सेलिब्रीटी सुनांच नशीब किती चांगले असतील. त्यांना स्वतःच्या इच्छेने जगता येत असेल. अभिनेत्री नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत सासू कृष्णा कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. कृष्णा कपूर कायम नीतू यांना ब्लाउज कसा असला पाहिजे, हा सल्ला द्यायच्या.
सासू कृष्णा कपूर यांच्याबद्दल सांगताना नीतू म्हणाल्या, 'माझं कृष्णा कपूर यांच्यासोबत सासू-सुने सारखे संबंध नव्हते. त्या कायम माझ्यासोबत एक चांगली मैत्रीण म्हणून राहिल्या. त्यांना माझ्यावर कधीचं कोणच्याही प्रकारची बंधनं लावली नाहीत.'
त्या पुढे म्हणाल्या, 'कृष्णा कपूर यांनी मला कायम महत्त्वाचा सल्ला दिला. त्या मला कायम रिवीलिंग ब्लाउज घालण्यासाठी सांगायच्या. कारण पती आपल्या मुठीत राहिला पाहिजे...'
एवढंच नाही तर यावेळी नीतू यांनी अभिनेत्री आणि सून आलिया भट्टसोबत असलेल्या नात्याबद्दल देखील खुलासा केला. त्या म्हणाल्या, 'आलिया आणि मी चांगल्या मैत्रिणी सारख्या आहोत.'
'आलियावर कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत, तिला जे करायच आहे, ते आलिया करू शकते, मला जे करायचं आहे ते मी करत आहे..' दरम्यान अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
'जुग जुग जियो' सिनेमातून त्यांनी अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर मजल मारली आहे. सिनेमात नीतू यांच्यासोबत अभिनेत्री किआरा आडवाणी, अभिनेता वरुण धवन आणि अनिल कपूर मुख्य भूमिका साकारली.