नेहाच्या लग्नात 21 पदार्थांची मेजवानी, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल

सोशल मीडियावर चर्चा 

Updated: Jan 7, 2020, 10:40 AM IST
नेहाच्या लग्नात 21 पदार्थांची मेजवानी, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल

मुंबई : नेहा पेंडसेचं लग्न खूप दिवसांपासून चर्चेत आहे. 5 जानेवारी रोजी अभिनेत्री नेहा पेंडसे बिझनेसमन शार्दुल सिंह बयाससोबत लग्नबंधनात अडकली आहे. नेहाच्या साखरपुड्यापासूनच सगळीकडे चर्चांना उधाण आलं होतं. आता तर तिच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. यासोबत आणखी एक फोटो व्हायरल होतोय ते म्हणजे नेहाच्या लग्नाच्या मेजवानीचा. 

लग्न म्हटलं की, पंचपक्वान्न हे आलंच. सध्या नेहाच्या लग्नातील थाळी देखील चर्चेत आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने या थाळीचा फोटो सोशल मी़डियावर शेअर केला आहे. या पंचपक्वान्नात तब्बल 21 पदार्थ मांडलेले आहेत. या पदार्थांची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अनेकदा आपण महाराष्ट्रीयन लग्नात पंजाबी पद्धतीचं जेवण पाहतो. पण नेहाच्या लग्नात मात्र अगदी मराठमोळ्या पदार्थांची चव चाखायला मिळाली. 

यामध्ये पुरणपोळी, पुरी, चपाती, टोमॅटो सूप, डाळिंबी उसळ, भरली वांगी, कढी, बटाट्याची भाजी, शेपूची भाजी, अंबाडीची भाजी, भाकरी, पिठलं, वरणभात, मसालेभात, अळूवडी, कोथिंबीर वड, मठ्ठा, बासुंदी, रसमलाई, पापड, लिंबूलोणचे यासारखे पदार्थ या लग्नात होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

नेहाने लग्नात पेस्टल गुलाबी रंगाची नऊवारी साडी, चंद्रकोर टिकली, नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर शार्दुल पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा फेटा अशा थाटात होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

लग्नानंतर तिने घेतलेला उखाणा व्हायरल होत आहे. 'चांदिच्या ताटात फणसाचे गरे.. शार्दुलराव आहेत बरे.. वागतील तेव्हा खरे..' असा उखाणा तिने घेतला. उखाणा घेताना ती फार आनंदी दिसत होती. अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहाचा हा गंमतीदार उखाणा पोस्ट केला.