तू समलैंगिक आहेस? नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देत Karan Johar म्हणाला...

Karan Johar : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक हा सध्या त्यानं चाहत्याला दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आहे. खरंतर करणला त्या नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की तो खरंच समलैंगिक आहे का? तर त्यावर करणनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 9, 2023, 10:46 AM IST
तू समलैंगिक आहेस? नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देत Karan Johar म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा सध्या त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे दोघे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. करण हा सोशल मीडियावर सक्रिय असव्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याच वेळा करण ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. नुकतंच एका नेटकऱ्यानं करण जोहरला तू गे समलैंगिक (गे) आहेस ना? त्यावर आता करणनं उत्तर दिलं आहे. 

करण जोहरनं थ्रेड या अॅपवर नुकताच चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्यासोबत एक सेशन ठेवलं आणि त्याच दरम्यान करणला अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. तर एक नेटकरी थेट करण जोहरला विचारत म्हणाला की तू समलैंगिक आहेस ना?  त्यावर उत्तर देत करण हो किंवा नाही असं काही बोलला नाही तर त्यानं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. You're interested? करण जोहरनं दिलेल्या या उत्तरानं सोशल मीडियावर आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.करणनं आणखी बऱ्याच नेटकऱ्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आहे. यावेळी एका नेटकऱ्यानं सगळ्यात मोठं रिग्रेट काय आहे असं प्रश्न विचारलं त्यावर उत्तर देत करण म्हणाला की त्याला या गोष्टीचं रिग्रेट आहे की त्याला श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. 

netizen asks Karan Johar that he is gay right directors respond shocked his fans

पुढे करण जोहरला विचारलं की भविष्यात त्याचं धर्मा प्रोडक्शन शाहरुख खानसोबत काम करणार का? आणि ते सलमान खानसोबत देखील चित्रपट बनवत आहेत? पण करणनं यावर कोणतही उत्तर दिलं नाही, तर उत्तर देत म्हणाला, असे प्रश्न विचारा ज्यावर उत्तर देऊ शकेल असे नाही की ज्यावर मला खोटं बोलावं लागेल.

हेही वाचा : पॅरीसच्या दंगलीत अडकली Urvashi Rautela, हॉटेल समोर घडलेल्या परिस्थितीचा 'तो' फोटो व्हायरल

करणच्या कामाविषयी बोलायचे झाले तर करणनं रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. वरुण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिका असणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.