मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे. या प्रकरणामध्ये मोठ्या कलाकारांचे आणि बॉलिवूडमधील इतर लोकांची नावे समोर येत आहे. त्यामुळे चांगलीच खबळ माजली. कोणाकडे ड्रग्स आहेत, कोण कोणला ड्रग्स पुरवतं इत्यादी गोष्टींची सखोल चौकशी एनसीबीकडून करण्यात येत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील याप्रकरणी अनेक चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान कोणत्याही स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही अशा आशयाचं ट्विट करत अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.
The”Big Guys”In my tweet. No drug supplying can happen without the ashirwad of local authorities.Those are the Big fish that swim away unquestioned.If a Journo can reach the suppliers on stings. Can’t the authorities sniff them out?Celebrities are soft targets. https://t.co/6clpnt00Ka
— Raveena Tandon (@TandonRaveena) September 25, 2020
ती म्हणाली, 'स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही. मात्र याप्रकरणी मोठ्या लोकांची चौकशी होत नाही. सेलिब्रिटींना सॉफ्ट टारगेट केले जात आहे. जर पत्रकार शोध घेत पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, तर अधिकारी त्यांना का शोधून काढत नाहीत.' अशा थेट प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.
रवीना टंडनचं ड्रग्स प्रकरणासंबंधीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग यांची देखील एनसीबी कडून चौकशी करण्यात आली आहे.