उत्तर प्रदेश : प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला 'पद्मावत'सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. करणी सेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे.
त्यांच्यातर्फे सिनेमाचा निषेध म्हणून भारत बंदची हाकही देण्यात आली होती.
उत्तर प्रदेशमधील अनेक थिएटर्समध्ये आंदोलकांनी तोडफोड केली. लखनऊ पोलिसांनी विशेष तयारी केली आहे.
लखनऊतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आंदोलकांची धुलाई केली जात आहे. विक्रांत दुबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पद्मावत: लखनऊ में पुलिस के चंगुल में फंसी करणी सेना,पुलिस ने ख़ूब बरसाई लाठियाँ. pic.twitter.com/R8G9OBh7Bu
— vikrant dubey (@shrivikrant) January 25, 2018
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थिएटर्स मालक आणि पोलिसांमध्ये 'सिक्रेट' डील झाली आहे. यानुसार ज्या थिएटर्समध्ये 'पद्मावत' रिलीज होतोय तिथे बाहेर पोलीस थांबतील.
जर कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करेल त्याला पोलीस समजवतील.
जर पोलिसांचे ऐकले नाही तर थिएटर्समध्ये असलेले बाऊंसर मिळून त्याची धुलाई करतील.