Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणजे राखी सावंत. राखी सतत अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आता ती तिच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिला चक्क एका पाकिस्तानी व्यक्तीकडून लग्नाचे प्रप्रोजल आले आहे. वास्तविक, पाकिस्तानी अभिनेत्री डोडी खानने नुकतेच राखीला लग्नासाठी प्रपोज केले होते. या प्रपोजलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर याबाबत बोलताना राखीसुद्धा डोडीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर तिने डोडीला आपला विश्वासघात करू नये अशी विनंतीही केली होती. पण आता त्याने राखी सावंतसोबत लग्न करण्यास नकार दिला आहे.
तो म्हणाला, "राखीने तिचे आई-वडील गमावले, तिला आजार आणि संकटांचा सामना करावा लागला. मग एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आली, ज्याने तिच्यावर अन्याय केला. राखीने या धक्क्यातून बाहेर पडून इस्लामचा स्वीकार केला, उमराह केला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले." डोडी म्हणाला की ही खूप मोठी गोष्ट आहे, माशाअल्ला." डोडी खानने लग्नाला नकार दिल्यानंतर राखी पुन्हा एकदा दु:खी झाली आहे. अलीकडेच डोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लग्न मोडण्याचे कारणही सांगत आहे. डोडीने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, राखी फक्त त्याची चांगली मैत्रीण आहे. तो तिच्याशी लग्न करू शकत नाही.
राखीसोबतच तिचा पहिला पती रितेश सिंहनेही व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना त्याने लिहिले, '@rakhisawant2511, राखी, ही तुझी निवड होती, जो स्वत:ची भूमिका घेऊ शकत नाही तो तुला पाठिंबा देईल का?, असेही मी हे होऊ दिले नसते'.
मला ती इतकी आवडली की मी प्रपोज केले. पण मला वाटते की लोकांना ते समजले नाही, मला खूप मेसेज आणि व्हिडीओ आले आणि लोकांनी टीका केली.
राखी तू डोडी खानची चांगली मैत्रीण आहेस आणि नेहमीच राहशील, पण तू माझी नवरी होऊ शकली नाहीस. होय, पण तू नक्कीच पाकिस्तानची सून होशील आणि मी तुझे लग्न माझ्याच एका भावाशी नक्कीच करीन."
याशिवाय यूजर्स या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी डोडी खानला अपशब्द बोलत आहे तर कुणी त्याला पाठिंबा देत आहेत.